ठाणे जिल्हा परिषद

           

विभाग : ग्रामपंचायत विभाग

प्रस्तावना


योजनेचे नाव – 15 वा वित्त आयोग.

योजनेचे कार्यक्षेत्र – जिल्हा परिषद ठाणे.

योजनेची कार्यपध्दती –

  • ग्रामपंचायतींनी ज्या बँका इ.सी.एस. (Electronic Clearance System)/ एन.ई.एफ.टी. (National Electronic Fund Transfer) किंवा आर.टी.जी.एस (Real Time Gross Settlement) या आधुनिक बँकींग सुविधा उपलब्ध करून देतील अशा आय.एफ.एस.सी.(IFSC) कोड धारण केलेल्या व एम.आय.सी.आर (MICR) कोड असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील बचत खात्यामध्ये सदरचा निधी ठेवणे.
  • सदर खात्यातील व्यवहार ग्रामपंचायतींच्या नावाने सरपंच व ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने होतील. तसेच पंचायत समितीच्या नावाने गट विकास अधिकारी यांचे स्वाक्षरीने करणे.
  • शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वितरीत निधीतून ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावर करावयाच्या बाबींच्या नियोजनाचे अधिकार व जबाबदारी ग्रामपंचायतींच्या सभेची (कमिटीची) राहिल. मात्र ग्रामपंचायतीच्या सभेत (कमिटीत) घेतलेले निर्णय ग्रामपंचायतींनी वेळोवेळी ग्रामसभेत सादर करणे.
  • वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाचे नियोजन करताना गरजेवर आधारीत नियोजन होईल याचीही दक्षता घेणे.
  • मान्य योजना व कार्यक्रमां व्यतिरीक्त इतर बाबी न घेणे. इतर बाब निकडीची वाटल्यास त्यासाठी राज्य शासनाची मंजूरी घेणे.
  • शासनाने विहित केलेल्या मान्य बाबींवरच या निधीतून प्राप्त होणाऱ्या व्याजाची रक्कम खर्च करणे व त्याचे हप्ता निहाय स्वतंत्र हिशेब ठेवणे.
  • ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण विहित वेळेत होईल याची काळजी घ्यावी व त्रुटींचे निराकरण तात्काळ करणे.
  • पंचायत राज संस्थांकडून प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च होणार नाही व जास्तीचे आर्थीक दायित्व निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे.
  • 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून ज्या बाबी/योजना/कार्यक्रम हाती घेण्यात आले असतील त्याचे दर्शक फलक संबंधित बाबी/योजना/कार्यक्रमाच्या ठिकाणी ठळकपणे दिसतील असे लावणे.