ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना:

ठाणे जिल्हातील ग्रामीण भागाच्या लोकसंख्येस प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत केले जाते. त्यासाठी खालील प्रमाणे आरोग्य संस्था कार्यरत आहेत. 0

प्राथमिक आरोग्य केंद्र :- 33

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र :- 183

प्राथमिक आरोग्य पथके :- 5

आयुर्वेद दवाखाने :- 1

जिल्हा परिषद दवाखाने :- 2


प्राथमिक आरोग्य केंद्र :-

प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व तातडीच्या वैद्यकीय सेवांची उपलब्धता, बाहयरुग्ण कक्ष, 6 खाटांचे आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, (कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया) प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्राकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये 15 कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्वच्छता व वाहन सेवा कंत्राटी पध्दतीने देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत.


उपकेंद्र:-

उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक(पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा 3 पदांस शासनाने मान्यता दिली आहे.


प्राथमिक आरोग्य पथक:-

ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासुन वंचित व अर्धवंचित ग्रामस्थांना त्यांच्या गावांमध्ये आरोग्य सेवेची सुविधा पुरविणे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत निदानात्मक उपचार पुरविण्याची तरतुद आहे. अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांसह निदानात्मक सुविधा पुरविणे. बालमृत्यु, मातामृत्यु दरात घट करुन आर्युमान वृध्दी करणे हाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


आर्युवेदिक दवाखाने :-

ठाणे जिल्हयामध्ये आयुष विभागाअंतर्गत 1 आयुर्वेदिक दवाखाना कार्यरत असन सदर दवाखान्यांमार्फत ग्रामीण भागामध्ये आयुर्वेंदिक उपचार केले जातात. आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता व परिचर कार्यरत असतात.


राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हयात खालील आरोग्य संस्था कार्यरत आहेत.

शासनाचे निकषानुसार साधारणत: बिगर आदिवासी भागात 30 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत प्रत्येक 5 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आदिवासी भागाकरिता 20 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य व 3 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हयात शहापूर हा तालुका संपुर्ण आदिवासी आहे. भिवंडी व मुरबाड हे अंशत: आदिवासी तालुके आहेत. व कल्याण व अंबरनाथ हे शहरी तालुके आहेत.

अ.क्र.

तालुका

प्रा.आ.केंद्र

उपकेंद्र

प्रा.आ.पथके

आयुर्वेदिक दवाखाने

जिल्हा परिषद दवाखाने

1

शहापूर

9

58

3

-

-

2

मुरबाड

9

30

1

1

2

3

कल्याण

3

18

-

-

-

4

अंबरनाथ

4

24

-

-

-

5

भिवंडी

8

53

1

-

-

 

एकूण

33

183

5

1

2


प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर स्टाफ पॅटर्न :-

अ.न.

अधिकारी व कर्मचारी

पद संख्या

1

वैदयकीय अधिकारी

2

2

आरोग्य सहाय्यक (पुरुष)

2

3

आरोग्य सहाय्यक (स्ञी)

1

4

सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ए.एन.एम)

1

5

प्रयोगशाळा तंञज्ञ

1

6

मिश्रक/औषध निर्माण अधिकारी

1

7

कनिष्ठ लिपीक

1

8

वाहन चालक

1

9

सफाई कामगार

1

10

स्ञी परिचर

1

11

पुरुष परिचर

3

 

एकुण

15


उपकेंद्र मंजूर स्टाफ पॅटर्न :-

अ.न.

अधिकारी व कर्मचारी पद

संख्या

 

 

 

1

सहाय्यक परिचारिका प्रसविका                                                               1

 

 

 

2

बहुउददेशिय आरोग्य कर्मचारी                                                               1

3

अर्धवेळ स्त्री परिचर                                                                             1                                            


प्रा.आ. केंद्रांनी आरोग्य संवर्धनाचे काम करावे तसेच आरोग्य सेवेचा विस्तार ग्रामीण भागात व्हावा ही प्रा.आ. केंद्राकडुन अपेक्षा आहे. आरोग्य शिक्षण हा या कार्यक्रमाचा आवश्यक (मुलभूत) भाग आहे. आरोग्य संवर्धनाचे काम करित असताना लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव निर्माण करणे, व त्यांचे पूर्ण सहकार्य मिळविणे आणि त्यांचा सहभाग मिळविणे अपेक्षित आहे. प्रा.आ.केंद्राकडून वितरीत होणा-या अपेक्षित मुलभूत सेवा खालीलप्रमाणेः-

१. प्राथमिक उपचार, प्रतिबंधात्मक सेवा
२. उपचारात्मक सेवा व संदर्भ सेवा
३. प्रजनन व बाल आरोग्य सेवा
४. आरोग्य व आहार विषयक शिक्षण
५. पाण्याचे गुणवत्तचे सनियंञण आणि मुलभूत स्वच्छतेसाठी मार्गदर्शन
६. स्थानिक पातळीवर अस्तित्वात असलेल्या रोगांचे प्रतिबंध व नियंञण कार्य
७. जीवन विषयक आकडेवारी एकञीकरण व अहवाल सादरीकरण
८. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे.
९. प्रयोगशाळेतील प्राथमिक (मुलभूत) तपासण्या.
१०. विविध प्रकारचे प्रशिक्षण
ठाणे जिल्हातील ग्रामीण भागातील जनतेस खालील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविण्यात येते.

1

राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम

 

2

राष्ट्रीय आर.सी.एच. कार्यक्रम

3

राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंञण कार्यक्रम

4

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंञण कार्यक्रम

5

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

6

राष्ट्रीय अंधत्व नियंञण कार्यक्रम

7

एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम

8

राष्ट्रीय एड्स नियंञण कार्यक्रम


या व्यतिरिक्त खालील कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविले जातात. 1. साथरोग नियंत्रण कार्यक्रम (पाणी शुध्दीकरण व साथ नियंत्रण कार्यक्रम.)
2. मृत्युच्या कारणांचे सर्वेक्षण (जन्म-मृत्यु)
3.नवसंजीवनी योजना – आदिवासी भागासाठी
4.नागरी नोंदणी पध्दतीची अमंलबजावणी
5.मातृत्व अनुदान योजना
6.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
7.पल्स पोलिआ लसीकरण मोहिम
8.जंतविरोधी मोहिम व जिवनसत्व “अ” वाटप मोहिम
9.आरोग्य शिक्षण व माहिती प्रसारण कार्यक्रम
या सर्व आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी पदे मंजूर आहेत

1.जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 1

2.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 1

3.सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 1

4.जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी (वर्ग 1) 1

5.प्रशासकिय अधिकारी (वर्ग 2) 1

6.सांख्यिकी अधिकारी (वर्ग 2) 1

7.जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (वर्ग 2) 1

8.सांख्यिकी पर्यवेक्षक 1

9.सांख्यिकी अन्वेषक 1

10.विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 1

11.प्रोजेक्टनिस्ट 1

12.आर्टिस्ट कम फोटोग्राफर 1

13.तालुका आरोग्य अधिकारी 5

14.वैद्यकिय अधिकारी (गट अ) 57

15.वैद्यकिय अधिकारी (गट ब) 24

16.आरोग्य पर्यवेक्षक (पुरूष) सरळसेवा 3

17.आरोग्य पर्यवेक्षक (पुरूष) पदोन्नती 8

18.आरोग्य सहाय्यक (पुरूष) 50

19.आरोग्य सहाय्यक (स्त्री) 38

20.आरोग्य सेवक (पुरूष) 124

21.आरोग्य सेवक (स्त्री) 346

22.औषध निर्माण अधिकारी 41

23.प्रयोगशाळा तंत्रज्ञ 21

24.कुष्ठरोग तंत्रज्ञ 5

25.सफाई कामगार 25