मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्ये
प्रत्येक संस्थेच्या प्रमुखाला साधारणपणे खालील प्रमुख कार्ये करावयाची असतात
नियोजन (Planning)
कोणत्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासाठी नियोजन हे सर्वात मोठे कार्य आहे. जिल्हा परिषदेची प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काय स्थिती आहे व आपल्याला काय साध्य करावयाचे आहे हे सर्वप्रथम ठरविणे आवश्यक आहे. आपण ठरविलेल्या उद्दीष्टांनुसार ते साध्य करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. सदरचे नियोजन करतांना सर्व संबंधित (stakeholders) यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. व पंचायत राज संस्थांमध्ये लोकशाही मध्ये
संघटन (Organizing)
- मानव्य व्यवस्थापन (Staffing)
समन्वय (Co-ordination )
नियंत्रण (Control)
नेतृत्व (leadership)
अंदाजपत्रक करणे. (Budgeting)
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदारी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 94 नुसार निर्माण केले आहे. या कायद्याच्या कलम 95 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कर्तव्ये व अधिकार नमुद करण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये आणि इतर कायद्याखाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करणे.
राज्यशासनाच्या नियामान्वये जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करुन देणे.
जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहणे.
जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांकडून अथवा कर्मचाऱ्यांकडून कोणतीही माहिती अथवा अहवाल मागविणे.
वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांना दोन महिने कालावधीची रजा मंजुर करणे. कोणताही अधिकारी रजेवर असताना किंवा बदली झाली असल्यांस सदर पदाच्या अनुपस्थितीत तात्पुरती व्यवस्था म्हणून इतर अधिकाऱ्यांकडे कार्यभार देणे.
जिल्हा परिषदेमध्ये राज्यशासनाने विहीत केलेल्या पध्दतीने वर्ग-3 व वर्ग-4 ची पदांची नेमणुक करणे.
जिल्हा परिषदेच्या सर्व कामांचे व विकास योजनांचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे.
जिल्हा परिषदेतील वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांच्या कामांचे दरवर्षी गोपनीय मुल्यमापन करुन शासनाकडे पाठविणे. तसेच वर्ग-3 व वर्ग-4 च्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे कामांविषयी गोपनीय अहवाल लिहीणेबाबत कार्यपध्दती निश्चित करणे.
जिल्हा निधीतून पैसे काढणे व त्याचे संवितरण करणे.
मुख्य कार्यकारी अधिकारी हे विविध समित्यांचे/ संस्थांचे प्रमुख असतात.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अध्यक्ष
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत कार्यकारी समितीचे अध्यक्ष
एकात्मिक पडीक जमिन विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणलोट विकास समिती
अवर्षण प्रवर्षण क्षेत्र कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणलोट विकास समिती
बालविकास प्रकल्पांसाठी जिल्हास्तरीय समिती
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य समिती अध्यक्ष
महाराष्ट्र ग्रामीण जिवनोन्नती अभियानाचे अध्यक्ष
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत नागरी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक बदलास मान्यता देणे जिल्हास्तरीय समिती.
जिल्हास्तरीय आदर्श गांव योजना समिती
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समिती
रोजगार व स्वयंरोजगार विभाग अंतर्गत बेरोजगारांच्या सेवा सोसायटयांना तसेच लोकसेवा केंद्राना विना निविदा कामे देणेबाबत समितीचे अध्यक्ष या व्यतिरिक्त मा.पालकमंत्री व मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या विविध समित्यांचे सदस्य देखील असतात.