ठाणे जिल्हा परिषद

           

विभाग : ग्रामपंचायत विभाग


प्रस्तावना


योजनेची कार्यपध्दती-
ग्रामपंचायतीची निवड-

सांसद आदर्श ग्राम योजनेत ग्रामपंचायत हा मूळ घटक आहे. सपाट ,मैदानी भागात एका पंचायतीची लोकसंख्या 3000 ते 5000, पर्वतीचे, जनजातीय, दुर्गम क्षेत्रात 1000 ते 3000 राहू शकेल. जिथे या घटकाचा आकार निश्चित नसेल तेथे अशा ग्रामपंचायतीची निवड होऊ शकेल. ढोबळ मानाने अपेक्षित प्रमाणांची लोकसंख्या असेल.


संबंधीत खासदारांस त्यांना योग्य वाटलेली ग्रामपंचायत निवडण्याचे स्वातंत्र राहिल. पण त्यांनी स्वत:चे वा आपल्या पतीचे/पत्नीचे गाव निवडू नये.


सांसद एक ग्रामपंचायत तत्काळ विकासासाठी निवडतील व आणखी दोन ग्रामपंचायत काही आवधीनंतर निवडून ठेवतील. लोकसभेचे सांसद आपल्या मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडतील. लोकसभेचे सांसद आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायत निवडतील तर राज्यसभेचे सांसद त्यांनी निवड ज्या राज्यातून झाली असेल त्या राज्यातील आपल्या मर्जीप्रमाणे कुण्याही जिल्हयाच्या ग्रामिण भागातील ग्रामपंचायतीची निवड करु शकतील. शहरी मतदारसंघाच्या बाबतीत (जिथे ग्रामपंचायत नसतात) संबंधीत सांसद जवळच्या एखादया ग्रामिण मतदार संघातील ग्रामपंचायतीची निवड करतील. या योजनेअंतर्गत मार्च 2019 पर्यत तीन ग्राम विकसीत करण्याचे आहे. त्यापैकी एक 2016 पर्यत ग्रामपंचायत विकसित करावयाची आहे. त्यानंतर अशा पाच आदर्श गावाची निवड करण्यात येईल. (दरवर्षी एक याप्रमाणे) आणि 2024 पर्यत त्यांचा विकास करणेत येईल.


अधिक माहितीसाठी शासनाचा दिनांक GR खालील लिंकवर पहावा.

"..\..\..\GR and Circural All Department\Villege Panchayat\सांसद आदर्श ग्राम योजना-अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचना.pdf