ठाणे जिल्हा परिषद

           

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा


प्रस्तावना:

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना Registration of Society ACT १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये करण्यात आलेली आहे.

जि.ग्रा.वि.यं. मार्फत दारिद्र्य रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अर्थ साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे करिता शासन निर्णय क्र. जिग्रा २००३/प्र.क्र. १७४३/ योजना - ५ मंत्रालय, मुंबई ४०००३२ अन्वये नवीन कृतीबंध लागू केला आहे.

विभागाची महत्त्वाची कार्ये:

  • केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
  • लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे.