ठाणे जिल्हा परिषद

           

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.

  • कल्याण तालुक्याचे क्षेत्रफळ एकूण 267.59 चौ.कि.मी. आहे. कल्याण तालुक्यांत एकूण 46 ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. व गावांची संख्या 84 आहे पैकी एक गांव ओसाड आहे. सन 2011 च्या जनगणेनुसार तालुक्यांची लोकसंख्या 124467 असुन एकूण कुटूंब संख्या 26818 आहे. कल्याण तालुका हा शहराला जवळचा असल्यामुळे तालुक्याचे क्षेत्र औदयोगिकदृष्टया विकसीत झालेले आहेत.

  • कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व असून टिटवाळा येथील गणपती मंदिर याच तालुक्यांत आहे.

  • तालुक्याचे मुख्य पीक हे भात आहे. तालुक्यामधुन उल्हास, काळू व भातसा नदया वहात असून नदीच्या पाण्याची व सिंचन विहीरीच्या पाण्याची उपलब्धता असल्यामुळे भाजीपाला, आंबा, नारळ व फुले इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. या तालुक्यातील भात पिकाखालील एकूण क्षेत्र 6400 हेक्टर आहे. सिंचनामुळे बागायत क्षेत्रात व उत्पादनात वाढ होत आहे.