ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना

प्रचलित शासन धोरणांनुसार 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु पाटबंधारे प्रकल्पांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील लघू पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. यासाठी योजनेच्या सिंचनक्षेत्रातील लाभधारक शेतक-यानी सहकारी पाणी वापर संस्था स्थापन करून योजना पूर्ण झाल्यानंतर ती ताब्यात घेऊन तीची पुढील देखभाल व दुरूस्ती करण्याबाबत हमी देणे आवश्यक आहे. आदिवासी क्षेत्रात लघु पाटबंधारे योजना घेण्यासाठी संबंधित गांवच्या ग्रामसभेने ठराव करुन मागणी नोंदविणे आवशक आहे. तसेच योजना पूर्ण झाल्यानंतर ती ताब्यात घेऊन तीची देखभाल करणे आवशक आहे. लघु पाटबंधारे योजनांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत.

  • लघु पाटबंधारे तलाव / सिंचन तलाव
  • पाझर तलाव
  • कोल्हापूर पध्दतीचा बंधारा / पक्का बंधारा
  • उपसा जल सिंचन योजना
  • गांव तलाव / साठवण तलाव
  • वळण बंधारा

लाभधारक शेतकरी, पाणी वापर सहकारी संस्था, संबंधित ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधी यांनी योजनेसाठी मागणी केल्यानंतर जागेची पहाणी करून कामाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्यात येते. योजना 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या आत असल्यास जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत निधी उपलब्धते नुसार सक्षमतेप्रमाणे प्रशासकिय व तांत्रीक मान्यता प्रदान करण्यात येते व ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे मार्गदर्शक सुचनेनुसार निविदेची कार्यवाही करणेत येते.

सन 2021-22 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात आलेली कामे खालील प्रमाणे आहेत.

अ.क्र

योजना प्रकार

कामांची संख्या

निर्माण झालेली सिंचन मता हेक्टरमध्ये

1

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे

8

68.14

2

पक्के बंधारे

44

139.86

3

वळण बंधारे

2

6.00

4

पाझर तलाव नुतनीकरण

4

47.00

5

बंधारे दुरुस्ती

33

69.50

 

एकूण

74

386.35