ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना:


पाणी पुरवठा व स्वच्छता समिती:-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची नेमणूक) नियम 1963 नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची नेमणूक करण्यांत येईल.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना:-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (अ) (1) कलम 81 च्या तरतुदींना अधीन राहून जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना करण्यात येते. सदर समितीचे पदसिध्द् सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तर सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतात. सर्व विषयसमितीची सभापती या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत व जिल्हा परिषद सदस्यांमधून चार सदस्य या समितीवर निवडून दिले जातात (SEE AMMENDMENT) या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लपा व ग्रामीण पाणीपुरवठा याचे पदसिध्द सदस्य असतात.