ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना

प्रस्तावना

                   पशुसवंर्धन विभाग, ग्रामीण भागातील जनावरांच्या रोगांची लक्षणे, व त्यावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे उपाय योजना करणे, तसेच दुधाळ जनावरांचे पालन, दुग्धव्यवसायाकरिता प्रशिक्षण देणे व पशुसवंर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान इ. विषयाची माहिती व प्रात्यक्षीक दाखवुन शेतक-यांना जनावरांची जोपासना चांगली करण्यांबाबत माहिती देणे हे या विभागामार्फत केल्या जाते. शासनाच्या पशुसवंर्धना संबंधीत विविध योजनांची अंमलबजावणी हा विभाग करीत असते. यामध्ये प्रामुख्याने, दुधाळ जनावरांचा गट वाटप, शेळी/मेंढी वाटप अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, स र्वसाधरण, दारीद्रयरेषेखालील, भुमिहीन जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ या विभागामार्फत दिल्या जातो.

                       जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. ठाणे हे विभागाचे प्रमुख असून, निरनिराळ्या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतात. तसेच ते केंद्रस्तर व राज्यस्तर व जिल्हा परिषद उपकारमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करतात.