ठाणे जिल्हा परिषद

           

विभाग : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

प्रस्तावना


1. DAY-NRLM (दिनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान) -


प्रस्तावना :--

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे (SGSY) रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) यामध्ये करण्याचा निर्णय दिनांक 18/7/2011 च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. सन 2015 पासून DAY-NRLM (दिनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान) असे रूपांतर झाले आहे. सदर अभियानाअंतर्गत सर्व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वयंसहाय्यता गट व संघीकरणाचे माध्यमातून एकत्रित करावयाचे आहे. दारिद्रय रेषेखालील कुटूंबाची स्वयंरोजगारीची लाभदायक क्षमतावृध्दी, स्वयंरोजगार व कौशल्यावर आधारित रोजगाराची संधी उपलब्ध करुन स्वरोजगारीचे कायम स्वरुपी उत्पादन वाढवून त्यांना दारिद्रय रेषेच्या वर आणणे हा मुख्य उद्देश आहे.


राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे केंद्र पुरस्कृत अभियान असून त्यासाठी उपलब्ध निधीमध्ये केंद्र शासनाच्या 75 % व राज्य शासनाचा 25 % हिस्सा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे राज्यास वार्षिक नियतव्यय प्राप्त होणार असून सर्व जिल्हयांना राज्यशासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य हिस्स्याचे नियतव्यय मंजुर करण्यात येते.


ठाणे जिल्हयात जागतिक बँकप्रणित अर्थसहाय्यातुन राबविण्यात येणा-या प्रकल्पाच्या माध्यमातुन Intensive पध्दतीने सन 2017-18 पासून 1. भिवंडी, 2. शहापूर. 3. कल्याण, 4. अंबरनाथ, 5. मुरबाड या पाच तालुक्यात काम करण्यात येत आहे.


www.umed.in या संकेतस्थळावर जाऊन या अभियानाची माहिती आपण घेऊ शकाल.

अनुदानाच्या बाबी व मर्यादा -

अ.क्र

अनुदानाच्या बाबी

किमान मर्यादा

कमाल मर्यादा

ठळक बाबी.

1

फिरता निधी

रु.10,000

रु.15,000

स्वयंसहाय्यता गटांना प्रथम श्रेणीकरणा नंतर प्राप्त गुणांनुसार अनुज्ञेय.

2

व्याज अनुदान

नाही

रु.3 लक्ष पर्यंत कर्ज रक्कमेवर

केंद्र शासनाकडून स्वयंसहाय्यता गटांना बँक व्याजदर व 7% व्याजदर यामधील तफावतीएवढे व्याज अनुदान अनुज्ञेय.

3

समुह बांधणी निधी (एकवेळ)

-

रु.10,000

SHG क्षमता बांधणी व बँक जोडणी निधी.

4.

क्षमता बांधणी निधी/ व्यक्ती

-

रु.7,500

प्रती व्यक्ती/ प्रती वर्ष


उपरोक्त सर्व अनुदान अनुसूचित जाती/ जमाती 50%, महिला 40%, अल्पसंख्यांकासाठी 15 %, अपंगासाठी 3 % प्रमाणे खर्च करण्याचे नियोजन आहे.

स्वयंसहाय्यता गटांना अर्थसहाय्य/ पतपुरवठा - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांना खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

1. पहिले अर्थसहाय्य/ पतपुरवठा - द्वितीय श्रेणीकरणानंतर पात्र स्वयंसहाय्यता गटांना त्यांच्या एकूण बचतीच्या 4 ते 8 पट किंवा किमान रु. 50 हजार यापैकी जी रक्कम अधिक असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात यावे.


2. दुसरे अर्थसहाय्य - पहिल्या अर्थसहाय्याची संपूर्ण परतफेड करणा-या स्वयंसहाय्यता गटास एकुण बचतीच्या 5 ते 10 पट किंवा रु.1 लक्ष यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात यावे.


3. तिसरे अर्थसहाय्य - स्वयंसहाय्यता गटाच्या प्रकल्प आराखडयाच्या (ऍक्टीव्हीटी) किंमतीनुसार किंवा किमान 2 ते 5 लक्ष रक्कमेएवढे, हे अर्थसहाय्यासूत्रीचे सर्वसाधारण पालन करणा-या गटास दुसरे अर्थसहाय्य 90% किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची परतफेड केल्यानंतर देण्यात यावे.


4. चौथे अर्थसहाय्य- स्वयंसहाय्यता गटाच्या प्रकल्प आराखडयाच्या (ऍक्टीव्हीटी) किंमतीनुसार किंवा किमान 5 ते 10 लक्ष रक्कमेएवढे, हे अर्थसहाय्य दशसूत्रीचे सर्वसाधारण पालन करणा-या गटास दुसरे अर्थसहाय्य 90% किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची परतफेड केल्यानंतर देण्यात यावे.


यंत्रणेची/समूहाची बांधणी आणि प्रशिक्षण:-

स्वयंसहाय्यता गटांच्या क्षमता बांधणीचे विविध घटक असून त्यापैकी खालील घटकांना प्राधान्य देण्यात येते.

  • दशसुत्रीचा अवलंब करणे
  • बँकेचे व्यवहार व पतविषयक जाणीव-जागृती
  • सध्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे
  • लिंग भेद दुर करणे व कायदेविषयक बाबी
  • कौशल्यवृध्दीद्वारे स्वयंरोजगार व वेतनी रोजगार
  • सनियंत्रणासाठी, लेख्यांची/ दैनंदिन व्यवहारासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर
  • संग्राम कक्षातील संगणकावर उत्पादणांचे दर पहाणे/ मार्केटिंगसाठी माहिती घेणे
  • महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी प्रशिक्षण.
  • संपर्क –

    जिल्हा परिषदस्तरावर :-

    1.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.तथा जिल्हा अभियान संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    2.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं.तथा जिल्हा अभियान सहसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    3.जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे.

    पंचायत समितीस्तरावर :-

    1.गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
    2. तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,MSRLM

    ग्रामपंचायतस्तरावर :-

    1.संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक.
    2. समुह संसाधन व्यक्ती (CRP)

    2. दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)

    उद्देश - महाराष्ट्र ग्रामीण भागातील गरीब कुटूंबातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे.

    ठळक वैशिष्टये -

    1. 3 महिन्याचे मोफत निवासी प्रशिक्षण
    2. प्रशिक्षणार्थींना गणवेश
    3. प्रशिक्षणामध्ये संगणक आणि इंग्रजिचा समावेश
    4. 75% युवकांना नोकरीची हमी
    5. कमीतकमी प्रतिमहा रुपये 6,000/- वेतन
    6. अल्प मुदतीचे व्यावसायिम प्रशिक्षण अभ्यासक्रम

    पात्रता

    1. किमान 8 वी पास
    2. दारिद्रय रेषेखालील कुटूंबे
    3. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी जोडलेल्या स्वयंसहाय्यता समूहाच्या सदस्यांच्या कुटूंबातील युवकांना / युवतींना प्राधान्य
    4. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे लाभार्थी
    5. या योजनेचे लाभार्थी 18 ते 35 वयोगटातील असले पाहिजेत.

    संपर्क –

    जिल्हा परिषदस्तरावर :-

    1.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.तथा जिल्हा अभियान संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    2.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. तथा जिल्हा अभियान सहसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    3.जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे.

    पंचायत समितीस्तरावर :-

    1.गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
    2. तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष MSRLM

    ग्रामपंचायतस्तरावर :-

    1.संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक.
    2. समुह संसाधन व्यक्ती (CRP)
    3. RURAL SELF EMPLOYMENT TRAINING INSTITUTE

    आर-सेटी प्रशिक्षण केंद्र :-

  • केंद्र शासनाच्या सुचनेनुसार प्रत्येक जिल्हयात प्रशिक्षण केंद्र स्थापन करायचे आहे.
  • उद्दिष्ट:- ग्रामीण तसेच शहरी भागातील 18 ते 35 वयोगटातील बेरोजगार युवक व युवतींचा कौशल्यवृध्दीतून स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे.
  • आर-सेटी प्रशिक्षण केंद्रासाठी 1 ते दीड एकर जागा राज्यशासनाने उपलब्ध करुन दिल्यावर केंद्रशासनाकडून बांधकाम व इतर सुविधांसाठी रुपये 1.00 कोटी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
  • सदयस्थितीत जिल्हा परिषद, ठाणे च्या आवारात तात्पुरते प्रशिक्षण केंद्र बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत चालविले जाते.
  • संपर्क –

    जिल्हा परिषदस्तरावर :-

    1.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.तथा जिल्हा अभियान संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    2.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. तथा जिल्हा अभियान सहसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    3. संचालक, आर-सेटी, ठाणे.
    4. जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे.

    पंचायत समितीस्तरावर :-

    1.गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
    2. तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष MSRLM

    ग्रामपंचायतस्तरावर :-

    1.संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक.
    2. समुह संसाधन व्यक्ती (CRP)

    4. अस्मिता योजना :-

    राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जि.प.शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्याकरिता *अस्मिता योजना* राज्यात राबविण्याबाबतचा महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.अस्मिता2018/ प्र.क्र.33/योजना-3, दि.1 मार्च 2018 अन्वये निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.
    अस्मिता योजनेंतर्गंत ग्रामीण भागातील महिलांना व अस्मिता कार्डधारक जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची खरेदी व विक्री किंमत खालीलप्रमाणे आहे.

    अ.क्र

    लाभार्थी

    सॅनिटरी नॅपकिनचा आकार

    8 पॅडच्या एका पॅकेटची स्वयंसहायता समूहांसाठी खरेदी किंमत

    स्वयंसहाय्यता समूहाचा हाताळणी खर्च / नफा

    विक्री किंमत

    1

    ग्रामीण भागातील महिला

    240 मी.मी.

    रु. 19.20/-

    रु.4.80/-

    रु.24/-

    2

    ग्रामीण भागातील महिला

    280 मी.मी.

    रु. 23.20/-

    रु.5.80/-

    रु.29/-

    3

    जि.प.शाळेतील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुली

    240 मी.मी.

    रु.4/-

    रु.1/-

    रु.5/-


    या योजनेंतर्गंत उमेद पुरस्कृत स्वयंसहायता समूहाची (SHG) सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदविण्यासाठी व त्याचा पुरवठा करण्यासाठी “अस्मिता” (ASMITA) या नावाच्या स्वतंत्र मोबाईल ॲपचा वापर करण्यात येत आहे.

    संपर्क –

    जिल्हा परिषदस्तरावर :-

    1.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.तथा जिल्हा अभियान संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    2.प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वि.यं. तथा जिल्हा अभियान सहसंचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ठाणे.
    3.उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.ठाणे.
    4.शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा परिषद ठाणे.
    5.जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, ठाणे.

    पंचायत समितीस्तरावर :-

    1.गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
    2.गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती.
    3. तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष MSRLM

    ग्रामपंचायतस्तरावर :-

    1.संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक.
    2. समुह संसाधन व्यक्ती (CRP)