ठाणे जिल्हा परिषद

           

प्रस्तावना

शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद, ठाणे यांचे  मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट माध्यमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे व ती टिकविणे हे असून योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.

 माध्यमिक शिक्षण विभागाकडे  ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या प्रशासनाची जबाबदारी असते.

या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता, सर्वांगीण विकासाकरिता विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये क्रिडा स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, INSPIRED  AWARD योजना, शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, इ. योजनांचा समावेशआहे.
महत्वाचे कार्य:

        1.  नवीन माध्यमिक शाळांना परवानगी देणे.

        2.  विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे मुल्यांकन करणे.

              3.  विनानुदानित तुकड्यांना अनुदानावर आणणे.

              4. माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देणे.

              5.  शाळेची पट पडताळणी करणे.

              6. वेतनेतर अनुदानाची तपसणी करणे.

        7.  इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेबाबत कामकाज.

         8.  माध्यमिक शाळांची तपसणी करणे.

                9.खासगी शाळांची सेवा निवृत्तीची प्रकरणे.

              10.विविध शिष्यवृत्ती परीक्षा कामकाज

              11.विविध शिष्यवृत्तीचा लाभ  विदयार्थ्यांना देणे

              12. माध्यमिक शाळांमध्ये मानव  विकास  योजना  राबविणे .