ठाणे जिल्हा परिषद

           


प्रस्तावना:

भारत हा कृषि प्रधान देश आहे. या देशातील महाराष्ट्रामधील कोकण प्रांतात ठाणे जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते, औजारे इ. बाबी शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे तसेच या बाबींची शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दृष्टिने जिल्हा परिषद, जिल्हाचे कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.

कृषी विभाग हा जिल्हा परीषदेचा महत्वाचा विभाग असून कृषी विकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी विभागातर्फे करण्यात येते.