ठाणे जिल्हा परिषद

           

समाज कल्याण विभाग

विभागाची कार्यपध्दती

मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना सर्व     त-हेच्या सोयी सवलती देवून त्यांची उन्नती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे. या विभागामार्फत खालीलप्रमाणे योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात.  या योजनांची योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते. प्राप्त तरतुदी मधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ/अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे, यास्तव खर्च केला जातो. तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस व 3% अपंग कल्याण सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या/अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजनांवर समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो. व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्य या विभागामार्फत सुरू आहे.