ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:


सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुख व पंचायत समितीस्तरावरील सर्व कार्यालये यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, तसेच प्रशासकियबाबी सर्व कार्यालयांना अवगत करणे, मा.मंत्री महोदय,मा.सचिव,मा.विभागीय आयुक्त यांच्या बैठकांबाबतची माहिती संकलीत करणे, आचारसंहिता कालावधित काय कार्यवाही करावी याबाबत संपुर्ण माहिती उपलब्ध करुन देणे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान, राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता अभियान, विभागस्तरारील बैठकांची माहिती संकलित करणे इ.बाबीचे सनियंत्रण करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज पाहणे व सदर सभांच्या इतिवृत्तावर योग्य ती कार्यवाही करणे, इतिवृत्त मंजुरी नंतर जनतेस पहण्यास उपलब्ध करुन देणे,जिल्हा परिषदेच्या समिती सभांच्या कामकाजाबाबत प्रशासकिय नियंत्रण ठेवणे, लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचे मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडुन संकलन करुन त्याबाबत खातेप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीस प्रसिद्धी देणे. जिल्हा परिषदेच्या विरुद्ध जनतेने अथवा अन्य प्राधिकरणांनी दाखल कलेल्या केसेस बाबत जिल्हा परिषदेच्या वतीने मा.न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजु मांडणे कामी वकिलांच्या नियुक्ती बाबतचे कामकाज करण्यात येते.