ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:


विभागाची कार्यपध्दती

      अर्थ विभागांतर्गत मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे नियंत्रणाखली कामकाज चालते. तसेच ते जिल्हा परिषदेचे आर्थीक बाबींचे सल्लागार असतात. या विभागामार्फत पुढीलप्रमाणे कामकाज चालते.

1. जिल्हा प्ररिषदेच्या लेख्याचे संकलन करणे.

2. प्रारंभिक लेखे व देयकाची तपासणी करणे,अर्थ संकल्पीय अंदाज व बिलांची तपासणी व प्रदान करणे, तसेच

    जि.प.च्या विविध विभागकडुन मंजुरीसाठी येणारी देयके मंजुर करुन प्रदान करणे.

3.जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे तसेच भविष्य निर्वाह निधी व

    गटविमा रकमा प्रदान करणे.

4. NPS योजना लागु असणा-या जिल्हा परिषदा‍कडील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांना PRAN नंबर 

     देणसाठीची कार्यवाही करणे तसेच दरमहा अंशदान कर्मचा-यांच्या NPS

      खात्यावर वर्ग करणेसाठी NSDL कडे पाठविणे.

5. जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे वेतन व भत्ते प्रदान करणे.

6. जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे तसेच तद अनुषगीक

    सर्व अभिलेख नोंदवहया अद्ययावत ठेवणे.

7. अर्थ संकल्पीय अंदाज पत्रक तयार करणे, आर्थीक जमाखर्चाच्या लेख्याचे विवरणपत्र तयार करणे.

8.  जिल्हा परिषदेच्या आर्थीक बाबीवर सल्ला देणे व आर्थीक दायीत्वावर लक्ष ठेवणे.

9.  मासिक व वार्षीक हिशेब संकलन करणे.

10. सर्व पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखापरिक्षण करुन घेणे व त्याच बरोबर स्थानिक निधी लेखा   

      परिक्षण व महालेखापाल यांचेकडील प्रलंबित परिच्छेद पुर्तता करणेकामी पाठपुरावा करणे व नियंत्रण

      ठेवणे.

11. जिल्हा परिषद कार्यालयाचे भांडार सांभाळणे

12. जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांची वेतन निश्चिती पडताळणीचे काम करणे.

13. निविदा तपासणी करणे.

14. व्याज ठेवी व अन्य गुंतवणुकी

15. स्वनिधी अंदाजपत्रक तयार करणे.