ठाणे जिल्हा परिषद

           

झालेल्या सभांचे इतिवृत्त:


झालेल्या सभांचे इतिवृत्त

  अर्थ समिती सभा दिनांक 23/04/2019  सकाळी   11.00 वाजता

स्थळ मा. सभापती तथा उपाध्यक्ष यांचे दालन

इतिवृत्त भाग – 1

       माहे एप्रिल 2019 रोजीची अर्थसमिती  सभा दिनांक  23/04/2019 रोजी सकाळी 11.00 वाजता मा.सभापती तथा उपाध्यक्ष यांचे दालनात आयोजित करणेत आली होती.

       प्रथम मा.  सभापती श्री सुभाष पवार अर्थ समिती तथा उपाध्यक्ष, जिप ठाणे यांनी उपस्थित सर्व सन्माननीय अर्थ समिती सदस्यांचे शब्द सुमनांनी  स्वागत करुन समिती सचिव तथा  मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिप ठाणे यांना सभेचे कामकाज सुरु करणेस सांगीतले. त्यानुसार श्रीम. गीता नागर, मु.ले.व. वि.अ  जिप ठाणे यांनी मा. सभापती यांच्या परवानगीने सभेचे विषय  निहाय कामकाज सुरु केले.   

 

विषय क्र. 1. दि. 25/03/2019 रोजी झालेल्या वित्त समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे व इतिवृत्ताचे वाचन करुन सर्वानुमते मंजूर करणेत आले.

विषय क्र. 2. दि. 25/03/2019 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्तावरील कार्यवाही अहवालास मान्यता देणेत आली.

विषय क्र. 3. शासनाकडून आलेले शासन निर्णय,  आदेश , महत्वाची परिपत्रके, महत्वाची पत्रे इत्यादी प्राप्त नसल्याने सदर बाबत माहीती निरंक असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगीतले.

विषय क्र. 4 वित्त समितीच्या सन्मा.सदस्यांचे सभेच्या अनुपस्थितीची रजा मंजूर करणे.

          वित्त समितीच्या सदस्यांचे अर्ज नसल्याने सदर बाबत माहिती निरंक असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगीतले.

 

विषय क्र. 5 मा. सभापती यांच्या मान्यतेने आलेले महत्वाचे विषय व आयत्या वेळचे  विषय म्हणून स्विकृत करणे.

        मा. सभापती यांचे मान्यतेने आलेले महत्वाचे विषयांवर पुढीलप्रमाणे चर्चा करणेत आली.

         मा. सदस्य श्री. गोकुळ नाईक यांनी आपण काही ठराव घेऊ शकतो का ? असे विचारले असता आदर्श आचार संहिता कालावधी असल्यामुळे ठराव घेता येत नाही असे  श्रीम गीता नागर, मु.ले. व वि.अ यांनी सांगीतले.

        तसेच मा. श्री. गोकुळ नाईक, सदस्य यांनी सर्व विभाग प्रमुखांनी बजेट तयार केले आहे अथवा कसे याबाबत विचारणा केली , त्यावेळी  श्रीम गीता नागर, मु.ले.व.वि.अ यांनी दिनांक 28/02/2019 रोजी  जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये सन 2018-19 चे सुधारीत व सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक मांडण्यांत आले असून,  त्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मंजूरी दिले बाबत सांगितले. तसेच यापुढील खर्च नियोजन हे सर्व खातेप्रमुख यांनी विषय समिती मध्ये सादर करुन मंजूर करुन घ्यावयाचे आहे असे  श्रीम गीता नागर  मु.ले.व वि.अ यांचेकडून सांगण्यांत आले.

       जिल्हा परिषद ठाणे च्या मुख्य इमारतीचे संरचना परिक्षण अहवालानुसार, जिल्हा परिषद ठाणेची मूळ इमारत धोकादायक असल्याने, मा. सभापती श्री. सुभाष पवार साहेब यांनी सदर जिल्हा परिषद ठाणेची मुख्य इमारत पावसाळयापूर्वी खाली करणे बाबत चर्चा केली.

          शेवटी उपस्थित सर्व सन्मा. सदस्य यांचे आभार मानून मा. सभापती यांचे परवानगीने सचिव तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.