ठाणे जिल्हा परिषद

           

अधिकार


अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार.–

  • अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .

  • ब) वेतन वाढी मंजुर करणे.

  • क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.

  • ड) गोपनिय अहवाल लिहीणे.

  • इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.

  • ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे


प्रशासकीय

  • 1.विभागामधील वर्ग-3 व 4 कर्मचाऱ्यांची आस्थापना

  • 2.विभागा अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांच्या आस्थापना विषयक बाबी

  • 3.विभाग अधिनियम संबधित संवैधानिक कामे.

  • 4.विभागाशी संबधित लेखा विषयक बाबी.

  • 5.विभागाशी संबधित आस्थापना विषयक तक्रारीची चौकशी

  • 6.विभागातील आहरण व संवितरण

  • 7.विभागातील आहरण व संवितरण.

  • 8.विभागांमार्फत चालु असलेल्या कामांची तपासणी करणे.

  • 9.स्थानिक निधी लेखा व सहा.लेखापाल्याचे कडील लेखा परिक्षण आक्षेपांची पूर्तता करुन घेणे.


पंचायत समिती सभापती यांचे अधिकार - –

1) पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-यांकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरणपत्र, हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.

2) गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेस किंवा जिल्हा परिषदेने अथवा पंचायत समितीने अथवा तिच्या निदेशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम विकास परियोजना, गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.