ठाणे जिल्हा परिषद

           

"माझी शाळा, प्रगत शाळा" अभियान


योजनेचे उद्देश


1.शाळेच्या विकास आराखडयासाठी निधी उपलब्ध करुन देणे

2.100% मुले प्रगत होण्यासाठी आवश्यकत्या शैक्षणिक पुरक साहित्य

   अ. ABL पुरक साहित्यांसाठी निधी उपलब्ध करुन देणे.

   ब. ज्ञानरचनावादी पध्दतीने शिकण्यासाठी साहित्य निर्मितीस निधी  

      उपलब्ध करुन देणे.

3.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या 

  सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शाळेला कला साहित्य, क्रीडा 

  साहित्य, ग्रंथालयातील पुस्तके गरजेनुसार उपलब्ध करुन घेण्यासाठी

  निधी देणे.

4.शासनाकडून येणारा सादिल खर्च केल्यानंतरही उर्वरित शाळेंच्या

  गरजा पुर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देणे.

5.लोक सहभागातून डिजीटल उपकरणांच्या करण्यात आलेल्या ई-   

  लर्निंग शाळांसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करुन   

  देणे.