ठाणे जिल्हा परिषद

           

आमदार आदर्श ग्राम योजनेचा उददेश सर्वागीण विकास साधणे हा आहे.


स्थानिक विकास आणि परिणामकारक स्थानिक शासन पध्दती असलेल्या आदर्श ग्रामपंचायती घडविणे जेणेकरुन आसपासच्या ग्रामपंचायतीना शिकण्याची व या आदर्शाना स्विकारण्याची प्रेरणा मिळू शकेल हे या योजनेचे मुख्य धेय्य आहे. सर्व लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्माननीय वागणूक , अंत्योदय, आर्थिक व समाजिक न्याय,श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, सार्वजनिक जीवनात पारदर्शिता, उत्तरदायित्व, स्थानिक स्वशासन व सुशासन, नैतिक मुल्यांचे पालन, स्थानिक सांस्कृतीक वारश्याचे जतन या मुल्यांवर आधारीत निवडलेल्या ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे.