ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:

                    जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत कृषिविषय जिल्हा परिषद सेस निधीतून योजना,राज्यपुरस्कृत योजना व   विविध  केंद्रपुरस्कृत योजना राबविल्या जाणा-या विविध  योजनांचे स्वरुप,तरतूद,राबविण्याची  कार्यपध्दती इ.गोष्टी   निश्चित केल्या जातात.या विविध योजना राबविताना   संबंधित जिल्हा परिषदेच्या समित्यांची मान्यता /अभिप्राय  घेऊन योजना राबविल्या जातात.या विभागामार्फ मुख्यत्वेकरुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या  जातात.तसेच जिल्हा स्तरावरुन गटस्तरावर अनुदान वितरण केले जाते.गट स्तरावर     

                     गटविकास अधिकारी पंचायत समिती   यांचे अधीनस्त कृषि विस्तार यंत्रणेची म्हणजेच कृषि अधिकारी,विस्तार अधिकारी (कृषि) नेमणूक करणेत आलेली  आहे.गटस्तरावरील या  यंत्रणेव्दारे विविध योजनांच्या   लाभार्थ्यांची निवड कृषि समितीव्दारे धोरनानुसार लाभार्थी स्वता: खरेदी करतात.जिल्हयातील खते, बियाणे , किटकनाशके या कृषि   निविष्ठांच्या पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण  ठेवण्यासाठी जिल्हा  परिषद कृषि विभागात कार्यरत मोहिम अधिकारी यांचेमार्फत  कृषि सेवा केंद्राची  तपासणी केली जाते.