ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती:


विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

शिक्षण विभाग (माध्यमिक) कडील योजना :-

1. विज्ञान प्रदर्शन :-

                     विज्ञान प्रदर्शन मा. संचालकांनी जाहिर केलेल्या विषयानुसार प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी या प्रदर्शनात केली जाते.  विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीयदृष्टया सृजनशीलता प्राप्त होते.   प्रदर्शनीय वस्तू तयार करताना वेगवेगळी कौशल्ये वापरली जातात.  प्रदर्शनीय वस्तूंचा व्यवहारात उपयोग करता येतो.  विज्ञान प्रदर्शनासाठी जिल्हा परिषदेकडून रु. 1,00,000/- पर्यंत रक्कम देण्यात येते. व उर्वरित खर्च संबंधित तालुक्यातील विज्ञान शिक्षक मंडळ व सेवाभावी संघटना करत असतात.

2. विज्ञान मंच -

                       सदरची योजना विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या अधिपत्याखाली सर्व राज्यातून राबविली जाते.  या योजनेत आठवी  पास झालेले विद्यार्थी ज्यांनी गणित व विज्ञान या विषयांवर शेकडा 65%  पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत असे विद्यार्थी भाग धेवू शकतात.  यासाठी राज्य पातळीवर विज्ञज्ञरनमंच पूर्व परीक्षा घेतली जाते.  गुणवत्तेनुसार अ गट (शहरी) व ब गट (ग्रामीण) भागातून 30 व  40 विद्यार्थी निवडले जातात. या उपक्रमासाठी रक्कम 14,000/- इतकी रक्कम मा.संचालक महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर कडून उपलब्ध होत असते.

 3. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (N.T.S)-

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत इ.10 वीत शिकत असलेल्या नियमित विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रज्ञावात विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्यांना प्रोत्साहीत करुन शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रथम राज्यस्तरीय निवड होवून भारतातून 100 विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. 4. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS) -

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना  हि केंन्दशासन पुरस्कृत योजना असुन ई.8 वी अखेर आर्थीक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विदयार्थ्यांचा शोध घेऊन बुध्द‍िमान विदयार्थ्यांना सर्वात्तम शिक्षण मिळावे यासाठी   आर्थिक सहाय्य केले जाते.

5.  माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती :-

                            शासन निर्णय शिक्षण विभाग क्र. एन. डि. एफ 2487/एस. दिनांक 10/11/1972 अन्वये माजी सैनिकांच्या मुलांना मोफत शिक्षण हि सवलत देण्यात येत आहे.  सदरची योजना 1985 अन्वये माजी सैनिकांच्या मुलांना मुलींना हि सवलत लागू केली आहे.  

या योजनेखाली मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्थेत शिक्षणाच्या सर्व स्तरावर इयता 1 ली ते इयता 12 वी पर्यंत सत्र फी,  प्रयोगशाळा फी, पुस्तक अनुदान व गणवेश अनुदान यासाठी शासन निर्णय 13.9.1994 अन्वये फी ची प्रतिपूर्ती करण्यात येते.

 

6.  प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत :-

                            शासन मान्य खाजगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या मधील पूर्णकालीक प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना फी माफीची सवलत शासन निर्णय क्रमांक /पीआरई/7068 एफ 18/6/1968  अन्वये लागू करण्यात आली आहे.   हि सवलत शिक्षणाच्या सर्व स्तरावर देण्यात येत.  तसेच शासन निर्णय क्र/पीआरई -7081/155547/1211/जीईएम 5 दि. 25/5/1981 अन्वये शासनाचे 1981-82 पासून माध्यमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इयत्ता 5 वी ते 7 वी च्या वर्गांना शिकविणा-या एस. एस. सी. डी. एड. अथवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांना प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत मोफत शिक्षण जाहिर केले आहे.  शासन मान्य प्रमाणित दरानुसार फीची प्रतिपूर्ती केली जाते.

7.   इयत्ता 10 वी पर्यत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण :-

                       शासन निर्णय क्रमांक एफर्ठडी 1096/प्र.क्र. 1978/96/साशि-5 दिनांक 13 जून 1996 अन्वये 1996-97 पासून शासनमान्य अनुदानित व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणित शुल्क दराने मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.   किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणा-या पालकांच्या पाल्यांना हि सवलत दिली जाते.  या सवलतीसाठी 75% उपस्थिती व चांगली वर्तणूक असणे आवश्यक असून अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना त्या वर्षापुरती सवलत रोखण्यात येते.  मात्र तो उत्तीर्ण होताच हि सवलत पूर्वीप्रमाणेच चालू होते.  

                       अनुदानित माध्यमिक शाळांच्या वेतनावर 100% अनुदान  शासनाकडून दिले जात असल्याने या योजनेखाली अनुदानित शाळाना फक्त सत्र शुल्क / प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दराने प्रतिपूर्ती करण्यात येते.

8.  पूर्व माध्यमिक  माध्यमिक शिष्यवृत्ती :-

                        पूर्व माध्यमिक व माध्यमिक शासनमान्य शाळेतील इयत्ता 5थी व इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परिक्षेचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून केले जाते.  शिष्यवृत्ती धारक पूर्व माध्यमिक गुणवत्त शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्तेत आलेल्या शिष्यवृत्तीधारक पूर्व माध्यमिक गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता 6 वी ते 8वी पर्यंत वार्षीक रु 1000/-मंजूर केली जाते. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्तेत आलेल्या शिष्यवृत्तीधारकांना इ. 9 वी ते इ. 10 वी पर्यंत वार्षीक 1500/- मंजूर करण्यात येते. वरील दोन्ही शिष्यवृत्ती धारकांची शिष्यवृत्ती विदयार्थ्यांच्या  खात्यावर ऑनलाईन जमा केली जाते  .

9. शालेय पोषण आहार योजना -

                                    शालेय पोषण आहार योजना ही 1 ली ते इ.5 वी प्राथमिक व इ.6 वी ते इ.8 वी अप्पर प्राथमिक अशा दोन स्तरावर राबविली जाते. सदर योजना ही मध्यान्ह भोजन योजना असून अनुदानित सर्व शाळांना इ.1 ली ते इ.8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो.

10. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना-

अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इ. 1 ली ते इ.10 या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णय क्रमांक पंपका-2007/270/07 असंक, दिनांक 23 जुलै 2008 अन्वये अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिचन,बौध्द, शीख, पारसी या समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन 2008-2009 पासून नव्याने सुरु केली आहे. मागील वर्षी 50 टक्केपेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेले तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असलेले विद्यार्थी या योजनेस पात्र ठरतात. सदर योजना राज्यातील  इ.1 ली ते इ.10 पर्यंतच्या सर्व शासकिय / निमशासकिय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत.

11.बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना.

                     सदर योजना हि भारत सरकारची केंन्द्र पुरस्कृत योजना आहे. इ.9 वी ते इ.12 वी अल्पसंख्याक मुलींसाठी (मुस्लिम,ख्रिश्चन,शीख,बैध्द,जैन आणि पारशी ) शिष्यवृत्ती देण्यात येते.शिष्यवृत्तीची रक्कम इ.9वी ते इ.10 करीता प्रत्येकी 5000/- रुपये दिली जाते.आणि इ.11वी व इ 12 वी साठी  प्रत्येकी 6000/- रुपये दिली जाते.

12. खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गंत अनुदानित शाळांना संगणक पुरवठा योजना.

                                    सदरची योजना ही मा.खासदार व मा.आमदार यांच्या निधीतून राबविण्यात येते.

13. पुस्तकपेढी योजना -

                                    आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.9 वी व इ.10 च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके या योजनेतून पुरविली जातात.

14. मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे मानव विकासावर आधारीत योजना राबविणे.-  महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र.माविमि-2010/प्र.क्र.81/ का.1418, मंत्रालय, मुंबई 32. दि.19 जुलै 2011 नुसार मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारीत योजना राबविणे या योजनेंतर्गंत ठाणे जिल्हयातील एकूण अनुक्रमे, शहापूर  व मुरबाड या तालुक्यांमध्ये सदरची योजना  राबविण्यात येत आहे. सदरच्या योजनेमध्ये शासननिर्णयाप्रमाणे खालील विषय समाविष्ठ करणेत आलेले आहेत.

योजना क्रमांक

विषय

01

इयत्ता 10 वी 12 वी मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता  विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे.

02

तालुक्यातील काही मोठया गावांमध्ये *अभ्यासिका* सुरु करणे.

03

ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देणे.

04

शासकीय तसेच अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये प्रयोगशाळेकरिता आवश्यक साहित्य पुरविणे.

05

तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे.

06

कस्तुरबा गांधी बालिका योजनेची व्याप्ती इयत्ता 10 वी पर्यंत वाढविणे.

 15.                आय.सी.टी.योजना (फेज-1  फेज-2) (Information & Communication Technology in Schools): -  सदरची योजना ही केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणानुसार या योजनेत संगणक प्रयोगशाळेसाठी 250 ते 300 चौरस फूट एवढया आकाराची पक्क्या स्वरुपाची सुरक्षित खोली उपलब्ध करुन द्यावी तसेच इंटरनेट सेवेसाठी शाळेचा दुरध्वनी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खोलीमध्ये विद्युतजोडणी आवश्यक आहे तसेच प्रत्येक संगणक कक्षात 10 संगणक संच, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, प्रोजेक्टर, युपीएस इ.सह संगणक प्रणाली यंत्रणा असेल.