ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत विविध समित्या:


विभागांतर्गत विविध समित्या

महिला व   बालकल्याण विभाग,जिल्हा परिषद,ठाणे

1.सेवा  उदीष्टे

सेवा

1.पूरक पोषण आहार

2.लसीकरण

3.आरोग्य तपासणी

4.संदर्भ सेवा

5.आरोग्य व सकस आहार विषयक शिक्षण

6.अनौपचारीक  पूर्व प्राथमिक शिक्षण

 उदीष्टे

  1. ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार दर्जा सुधारणे.

2.मुलांच्या मानसिक,शारीरीक व सामाजिक विकासाचा पाया घालणे.

3.बालमृत्यू ,मुलांचा रोगटपणा ,कुपोषण ,गळतीचे प्रमाण कमी करणे.

4.स्तनदा मातांना पुरक पोषण आहार आणि आरोग्य विषयक शिक्षण देऊन जागृती निर्माण करणे.

5.विविध खात्यांमध्ये धोरण व अंमलबजावणी बाबत समन्वय घडविणे.

2.आढावा समित्या

1.टास्क फोर्स-गठीत करण्यांबाबत------

   कुपोषणाची कारणे शोधुन उपाययोजना संदर्भात

 शासन निर्णय क्रमांक एबावि 2008/ प्र.क्र.74 / का-5 दिनांक 4 मे ,2009 अन्वये कुपोषणाची कारणे शोधुन त्यावर उपाययोजना करण्याकरीता युध्द पातळीवर कुपोषण निर्मुलनाचा कार्यक्रम सुरू करण्याबाबतची पार्श्वभुमी व कार्यवाही करण्याच्यादृष्टीने ,कुपोषणाची मुळ कारणे शोधुन त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेऊन ,त्याव्यतिरीक्त ठोस उपाययेजना करण्ंयासाठी व कुपोषण व बालमृत्यू निर्मुलनाच्या अनुषंगाने कालबध्द कार्यक्रम आखून उपाययेजना सूचविण्यासाठी व सनिंयत्रण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर कृती दल (Task Force ) समिती गठीत करणेंत आलेली आहे.व सदरची सभा महिन्यातून एकदा घ्यावयाची आहे.

योजना

1.भारतरत्न  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतंर्गत  अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा सव मातांना एक वेळ चौरस आहार  देणे व 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अंडी/केळी ॠतुमानानुसार  फळे देणे.

                   अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक (Calories) व प्रथिनाच्या (Proteins) कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त असून आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे.आदविासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात,असे अनके संशोधन अभ्यासावरून सिध्द झाले आहे.या पार्श्वभूमिच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व  गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणे  6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील अंडी/केळी ॠतुमानानुसार  फळे देणे.देण्याची योजना सुरू करणेंत आलेली आहे.

2."बेटी बचाओ बेटी पढाओ"

                 "बेटी बचाओ बेटी पढाओ"हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम असून यापुर्वी काही ठराविक जिल्हयात राबवणेंत येत होती.हा कार्यक्रम महिला व बाल विकास विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग आणिी मानव संसाधन विभाग यांच्या संयुक्त विधमाने राबविण्यात येत आहे.

                 "बेटी बचाओ बेटी पढाओ"हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम राज्यातीलल सर्वच जिल्हयात राबविणेबाबत आदेश असल्यामुळे सदयस्थितीत ठाणे जिल्हयातही राबविणेंत येत आहे.

योजनेची उदिष्टे-

1.लिंग निवडीस प्रतिबंध करणे.

2.मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे.

3.मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबददल खात्री देणे.

 

3.पोषण अभियान

                  महाराष्ट्र राज्यात " पोषण अभियान "हा कार्य्रकम सुरू करण्यात आलेला आहे.सन 2018-2019 या वर्षात अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 30 जिल्हयात करण्यात येत आहे.त्या 30 जिल्हयात ठाणे जिल्हयाचा देखील समावेश आहे.या अभियानातंर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमधील खुजे किंवा बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे,बालकांमधील कुपोषण ,रक्तक्षय,जन्मत:, कमी वजनाचे बालकांचे प्रमाण तसेच 15 ते 49 वयोगटातील किशारेवयीन मुली व जन्मानंतरचे पहिले 1000 दिवस यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.पोषण अभियानातील उदिष्टे व इष्टांक साध्य करण्यासाठी " अभिसरण कृति आराखडा" या घटकांचा अत्यंत महत्वाचे साधन म्हणून पोषण अभियान या कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.या अभियानांतर्गत प्रभावी सेवा देण्याची हमी देण्याकरिता विविध विभागातंर्गत काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये फलनिष्पती होणे समन्वय असणे आवश्यक आहे.त्यानुसार खालील बाबींवर अभियान राबविणेंत येत आहे. 

  1.अंगणवाडी केंद्राचे बळकटीकरण करणे,

  2.पुरक पोषण आहाराच्या गुणवत्तेची खात्री.

  3.प्रभावी आरोग्य सेवा.

  4.पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण ,माहिती शिक्षण आणि संप्रेषण या विषयाचे बळकटीकरण करणे.