ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती:


अ.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश (दोन ओळीत)

लाभार्थी / पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव

दूरध्वनी क्रमांक

राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम 

 

१ स्वयंपाकासाठी बायोगॅस   

 पुरविणे.

२ एल.पी.जी. व इत्तर पारंपारीक उर्जा साधनांचा वापर कमी करणे

 

१.लाभार्थीकडे स्वत:ची मालकीची जागा आवश्यक.

२.पुरेसे जनावरे उपलब्ध अरणे आवश्यक.

३.या योजनेचा पुर्वी लाभ घेतलेला नसावा.

कृषि-३

०२२ २५३४११९२

आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत /क्षेत्राबाहेरील (TSP / OTSP) आदिवासी शेतक-यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना.

 

आदिवासी शेतक-यांचे कृषि उत्पादन वाढीस सहाय्यक करुन त्यांच्या आर्थिक उन्नतीस मदत करणे

 

१ लाभार्थी हा दारीद्रय  रेषेखालील 6.00 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन धारण करणारा आदिवासी शेतकरी असावा.(7/12,8 अ उतारा व जातीचा दाखला आवश्यक)

२ )दारिद्रय रेषेखालील लाभार्थी नसल्यास अशा लाभार्थीकडे त्यांचे वार्षिक उत्पन्न एकूण रु. 25,000/- पर्यंत मर्यादेत असावी.( उत्पन्नाचा दाखला आवश्यक)

 

 

 

कृषि-४

०२२ २५३४११९२


अ.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश (दोन ओळीत)

लाभार्थी / पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव

दूरध्वनी क्रमांक

) अनुसुचित जाती  उपयोजना (SCP) अंतर्गत अनुसुचित जाती /नवबौध्द शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याची योजना.

 

 

अनुसुचित जाती/नवबौध्द शेतक-यांच्या  कृषि उत्पादन वाढीस सहाय्यक करुन त्यांच्या आर्थिक उन्नतीस मदत करणे

 

१) लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील 6.00 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन धारण करणारा अनुसुचित जाती / नवबौध्द शेतकरी असावा.

2)दारिद्रय रेषेखालील लाभार्थी नसल्यास अशा लाभार्थीकडे 6.00 हेक्टर पेक्षा कमी जमीन व त्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,50.000/- पर्यंतेच्या मर्यादेत असावे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कृषि-४

०२२ २५३४११९२

शेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध साहित्य पुरवठा करणे.

१. बचतगटांना/ग्रामसंघांना/लोकसंचलित साधन केंद्रांना कृषि यांत्रिकी करणाच्या माध्यमातुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे.

 

२. शेतीमध्ये बहुतांशी महिला काम करतात. यांत्रिकीकरणामुळे प्रत्यक्ष शेतीत काम करणाऱ्या महिलांचे शारिरीक श्रम कमी करणे.

 

३. शेतीतील मजुरी या घटकावरील खर्च कमी करणे तसेच वाढलेल्या मजुरीच्या दरामुळे उत्पादन खर्चात होणारी वाढ कमी करणे.

 

४. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेगात, वेळेत व गुणवत्ता पूर्ण करणे.

 १. सदर योजनेचा लाभ बचतगट, ग्रामसंघ तसेच लोकसंचलित साधन केंद्र यांना देय राहिल.

 

२. जिल्हयात महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बचतगटांची संख्या मोठी आहे. या योजनेचा लाभ या यंत्रणेकडील बचतगट, ग्रामसंघ, लोकसंचलित साधन केंद्र यांना प्रथम प्राधान्याने देण्यात येईल.

 

३. रोजगार निर्मिती हा उददेश असल्याने बचतगट, ग्रामसंघ, लोकसंचलित

 

साधन केंद्र यांचे नावे शेतजमीन असण्याची आवश्यकता नाही. ४. या योजने अंतर्गत ट्रॅक्टर व असेसरीज, पॉवर टिलर व असेसरिज, भात लावणी यंत्र (Transplanter), भात कापणीयंत्र (Reaper), गवत कापणी यंत्र (Brush Cutter), मळणीयंत्र (Thresher) डिझेल इंजिन पंपसंच, पेट्रो इंजिन पंपसंच, पेट्रोडिझेल इंजिन पंपसंच, स्प्रेपंप, पाईप संच व कृषि विभागाने नमुद केलेली इतर औजारे यांचा समावेश असेल. ट्रॅक्टर खरेदी केल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडे ट्रॅक्टरचा विमा व नोंदणी करणे आवश्यक राहिल. ५. या योजनेंतर्गत प्रति लाभार्थी खर्चाच्या ९०% जास्तीत जास्त र.रु.०३.०० लाख एवढे प्रोत्साहनपर सहाय्यक अनुदान देय राहिल. उर्वरित १०% हिस्सा लाभार्थीनी भरावयाचा आहे.

 

 

 

कृषि-२

 

०२२ २५३४११९२

 

 

 

 

 

 

 


अ.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश (दोन ओळीत)

लाभार्थी / पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव

दूरध्वनी क्रमांक

बचतगटांना/ ग्रामसंघांना अनुदानाने औजारे बँक (Tool Bank) देणे

  (हरितयंत्रे)

 

 

१.ग्रामीण भागातील महिला बचतगटांना कृषि क्षेत्रातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण्‍ करणे

२.कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देऊन मजुरांअभावी येणारी समस्या दुर करणे.

1. ग्रामीण भागातील नोंदणीकृत महिला बचत गट.

2. महिला बचतगटांचा नोंदणीकृत ग्रामसंघ

3.महिला बचतगटांचे नोंदणीकृत लोकसंचलित साधन केंद्र यांना लाभ देय                                                          लाभ देय

कृषि-2/3

 

०२२ २५३४११९२

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना सुधारीत कृषि औजारांचा पुरवठा करणे

शेतक-शंतक-याना तसेच बचत गटांनाा स्वयंचलीत व मनुष्य बळाने चालनारी विधि सुधारीत अवजारे अनुदानाने पुरवठा काणे.

१. सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजुर, बचत गट, ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यां व NGO यांना देय राहील. शेतमजुर, बचत गट, ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व NGO यांचे बाबत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे स्वतःचे नावे शेतजमिन असण्याची आवश्यकता नाही.

२. पात्र लाभार्थी ठरविणेचे अधिकार पंचायत समिती किंवा गटविकास अधिकारी यांना राहील. लाभार्थी निवड करताना प्रथम येणा-या शेतक यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल.

३. स्वयंचलित यंत्राने चालणारी सुधारीत औजारे उदा. पॉवर टिलर, पॅडी ट्रान्सप्लांटर, रिपर, ग्रास कटर, पॉवर विडर, पॉवर थ्रेशर, विनोविंग फॅन, चाफ कटर, पेरणी यंत्र, तसेच इतर सर्व स्वयंचलित यंत्राने चालणारी औजारे यांना अनुदान देय राहिल.

कृषि-2/3

 

०२२ २५३४११९२

 

7

 

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना विविध कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे

 

विविध पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी, विविध कृषि निविष्ठा, सुधारीत, संकरीत बियाणे, जैविक, रासायनिक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, रासायनिक व जैविक किटकनाशके इत्यादी स्थानिक पातळीवर अनुदानाने उपलब्ध करुन देणे. तसेच बियाणे बदलाचा दर वाढविणे व एकात्मिक पीक संरक्षण उपायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे. खतांच्या वापरातून जमिनीचा पोत सुधारणे व पिकांच्या उत्पादनात वाढ करणे.

 

१. सदर योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजुर, महिला, बचत गट, ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच NGO यांना देय राहील. शेतमजुर, महिला, बचत गट, ग्रामसंघ व आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या व NGO यांचेबाबत रोजगार निर्मिती हा उद्देश असल्याने त्यांचे स्वतःचे नावे शेतजमिन असण्याची आवश्यकता नाही.

 

२. पात्र लाभार्थी ठरविणेचे अधिकार पंचायत समिती किंवा गटविकास अधिकारी यांना राहील. योजनेचा लाभ देताना प्रथम येणा-या शेतक-यांना प्रथम प्राधान्य देणेत येईल.

 

३. विविध कृषि निविष्ठांमध्ये, सुधारीत, संकरीत बियाणे, कंद, कलमे, रोपे, संजीवके, संप्रेरके, जमीन सुधारके. (उदा. जिप्सम ) जैविक, रासायनिक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, रासायनिक जैविक किटकनाशके इत्यादी सर्व प्रकारच्या कृषि निविष्ठांना अनुदान देय राहील.

 

कृषि-2/3

 

०२२ २५३४११९२