ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:

                 ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत   प्रकल्प शाखा,  देखभाल दुरुस्ती कक्ष,  व यांत्रिकी  उपविभाग कार्यरत आहे. ग्रामीण   भागाची  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र श्ंासनाच्या तसेच राज्य  शासनाच्या  मागणी आधारित धोरणांतर्गत विविध योजना  राबविण्यात येत आहेत.प्रकल्प शाखा व यांत्रिकी  उपविभागाच्या माध्यमातुननळ पाणी पुरवठा योजना, साधी विहिर , विंधण विहिर, लघु नळ पाणी पुरवठा योजना तसेचदेखभाल दुरुसती कक्षांतर्गत नाविन्यपुर्ण उपाययोजना  व पाणी पुरवठा येाजना दुरुस्ती  यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा  विभागामार्फत करण्यात येणा-या  विभाग  निहाय  कामांचा तपशील खालीलप्रमाणे.

प्रकल्प शाखा :-

  • जल जीवन मिशन कार्यक्रम

     सन 2009-2010 पासुन केंद्र शासन पुरस्कृतसुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीणपेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनामध्ये समाविष्ठ पुर्नरचना करणेत आली. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2024पर्यत  हर घर नल से जल (FHTC-F untoinal  Household Tap Connection ) प्रमाणे पाणी पुरवठा  करण्याचे ध्येय  आहे.सन 2024 पर्यत  राज्यातील  ग्रामीण भागातील प्रत्येक घरांत  वैयक्तिक  नळ जोडणीव्दारे  दरडोई किमान 55 लिअर प्रती दिन,गुणवत्ता  पुर्ण पाणी  पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्यिष्ठ आहे.

 

  • यांत्रिकी   विभाग
  •  नवीन विंधन विहिर  घेणे
  • विंधन विहिर दुरुस्ती
  •  विंधन विहिर  फल्‍शिंग
  • हातपंप बसविणे व कटटा  बांधणे
  • दुहेरी पंपावर  आधारित लघु नळ पाणी  पुरवइा योजना
  •  सौर ऊर्जेवर  आधारीत  नळ पाणी  पुरवठा योजना

 

  • देखभाल दुरुस्ती कक्ष
  • साधी  विहिर  दुरुस्ती
  •  अस्तित्वातील  नळ पाणी पुरवठा  योजना दुरुस्ती
  •  प्रादेशिक नळ पाणी पुरवठा  योजना दुरुस्ती
  •   अस्तित्वातील  सर्व योजनाची माहिती  अद्यावत  ठेवणे


              

  गावामधील  आवश्यक उपाययोजना  उदा. उध्दव निर्मिती ,वाढीव  पाईपलाईन नवीन स्वतंत्र योजना, नवीन प्रादेशिक  योजना  व आधारीत  लघु नळ पाणी पुरवठा  योजना करण्यात येणार  आहेत.  त्याअनुषंगाने  पुढील 4 वर्षासाठी  महसूल  गावनिहाय गाव कृती आराखडा सादर करण्यात येत आहे. व सदर कार्यक्रमाची  कार्यप्रणाली  व निकषाबाबत  शासनाच्या  प्राथमिक  मार्गदर्शक  सुचनाचे  अनुषंगाने कार्यवाही .

 

तालुका

 गावांची संख्या

 घरांची संख्या

31/3/2022 पर्यत नळ जोडणे संख्या

 दि. 1.4.2022 रोजी शिल्लक  उद्यिष्ठ

   सन 2022-23 मध्ये साध्य

अंबरनाथ

63

20036

11462

8574

1538

भिवंडी

221

95922

57481

38451

4875

 कल्याण

83

23012

19675

9337

2106

मुरबाड

203

40302

10388

29914

888

शहापुर

226

72303

32653

39650

2393

 एकुण

796

251575

131659

125926

11800