ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटपविभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती:


                                           राज्य पुरस्कृत योजना:-

शबरी आदिवासी घरकुल योजना

योजनेचा उद्देश :-

अनुसुचित जमातीतील गरीब-गरजू, बेघर व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी सहाय्य व अनुदान देणे.

निवडीचे निकष :-

1. लाभार्थी अनुसुचित जमाती संवर्गाचा असावा.

2. लाभार्थ्याकडे अनुसुचित जमातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

3. महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.

4. लाभार्थीकडे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची अथवा शासनाची जमीन असणे आवश्यक आहे.

5. लाभार्थीकडे   स्वत:चे अथवा कुटुंबाचे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे.

6. विधवा, परितक्त्या, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थींना प्राधान्य.

7. ग्रामीण क्षेत्रासाठी उत्पन्न मर्यादा रक्कम रु.1.20 लाख पर्यंत असावे.

8. लाभार्थ्यांने इतर योजनांमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.

  • आदिम जामतीच्या कुटुंबासाठी घरकुल योजना
  • योजनेचा उद्देश :-

    आदिम जमातीचा समाज गाव, वाडया, पाडे, वस्त्यांवर राहतात. आदिम जमात हा स्थलांतर करणारा समाज असून त्यांना स्वत:ची घरेही नाहीत

    . तर काहीची कुडा-मातीची घरे आहेत, अशा आदिम जमातीच्या कुटुंबाना पक्के घरकुल देऊन त्यांना शौचालय, स्थानगृह व विद्युत सुविधा उपलब्ध करुन त्यांना शाश्वत व कायम स्वरुपाचा निवारा उपलब्ध करुन देणे, स्थलांतराला आळा घालुन त्यांचे राहणीमानात सुधारणा घडवून आणणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

    निवडीचे निकष :-

    1. लाभार्थी हा कातकरी, कोलाम, माडीया-गोंड या आदिम जमातीचा असावा.

    2. लाभार्थ्याकडे अनुसुचित जमातीचा   दाखला असणे आवश्यक आहे.

    3.  घरकुल बांधकामास स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जागा असावी 

    4. लाभार्थीचे   स्वत:चे   पक्क्या स्वरुपाचे घर नसावे.  

    5.  यापुर्वी शासनाच्या कोणत्याही  योजनेमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा.

     

  • रमाई आवास योजना
  • योजनेचा उद्देश :- अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील गरीब-गरजू, बेघर व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी सहाय्य व अनुदान देणे.

    निवडीचे निकष :-

    1. लाभार्थी अनुसुचित जाती/नवबौध्द संवर्गातील असावा.
    2. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.
    3. लाभार्थी बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
    4. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात यावा, विभक्त असल्यास रेशनकार्ड विचारात घ्यावे.
    5. यापुर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    6. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखाच्या आत असावे.
    7. सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) च्या प्रपत्र ड मध्ये असलेले अनुसुचित जाती  तथा नवबौध्द घटकातील जे लाभार्थी रमाई आवास योजनेचे (ग्रामीण) अद्ययावत निकष पुर्ण करत असतील असे लाभार्थी रमाई आवास घरकुल या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र असतील.
    8. घर बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी.