ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा ( Case study )_

जयदेव स्वयंसहायता समुह


उमेद अभियान कल्याण –

  • गटाचे नाव - जयदेव स्वयंसहायता समुह
  • गटाचा पत्ता – मु.पो.फळेगाव,ता.कल्याण,जि.ठाणे.
  • गटाची स्थापना – २८/११/२०१२
  • बँकेचे नाव – विजया बँक
  • खाते क्र .- ५११५०१०११००१५५०
  • अध्यक्ष नाव – सौ.जयवंती प्रकाश जाधव
  • मो.न.-९५९४३५२३१३
  • फळेगाव येथील सोळा महिला एकत्रित येऊन जयदेव स्वयंसहायता गटाची स्थापना केली.त्यात सर्व महिला गरीब आणि गरजू होत्या कोणताही व्यवसाय हाती नवता.चार महिने शेती करायची व आठ महिने बसायचे.त्यामुळे महिलांना घर चालवण्यास खूप अडचणी यायच्या.घरात कमावता माणूस एक ,त्यात मुलांचे शिक्षण कपडे,घरातील किराणा खर्च, इतर खर्च यात महिला नेहमी नाराज असायची.त्यात आम्हा महिलांना साथ मिळाली ती गटाची. गटात एकत्रित येऊन महिला काटकसरीने बचत करून १०० रु.बचत करू लागल्या. हे पैसे आम्ही अंतर्गत कर्ज म्हणून वापरण्यात सुरुवात केली.लहान लहान कर्ज घेऊन वापरण्यास सुरुवात केली.लहान लहान कर्ज घेऊन महिला आपल्या घरातील गरजा पूर्ण करू लागल्या. आम्ही गटात व्याज जमा करायचो पण हप्ताथकीत असायचा त्यामुळे हि बचत आमची अनियमित होती.


    सन २०१७ ऑक्टोबरला हा गट उमेद अभियानात आला व गाव फेरी चालू असताना गटाचे महत्व काय आहे.गट कसा चालवायचा अशी दशसुत्रीची माहिती मिळाली.यातून गटाचा विकास होण्यास सुरुवात झाली.


    आमच्या गटातील महिलांनी काही रोजगार करावा व दोन पैसांची आवक व्हावी हा विचार मनात नेहमी यायचा.या विषयावर गटात चर्चा व्हायची.गटातील सर्व महिलांचे पती हे मजुरी करत असत. त्यामुळे घर चालवीन्यास महिलेला खूप अडचणी यायच्या नेहमी पैश्याची अडचण असायची.


    उमेद अभियाना मार्फत ICRP (प्रेरिका)ची माहिती देण्यात आली.गटातील महिला साठी जाणीव व धडपड पाहून गटातील महिलांनी मला ICRP (प्रेरिका) होण्यास मंजुरी दिली. आपण या अभियाना मध्ये काम करू शकतो आणि महिलांना मार्गदर्शन करू शकतो ज्यामुळे महिलांचा फायदा होईल.हि धारणा घेऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये उमेद सोबत ICRP (प्रेरिका) या पदावर काम करत आहे. व तेथूनच माझा आयुष्यात बदल होण्यास सुरुवात झाली.


    माझा गटा सोबत मी दहा गटांचे काम करत आहे.उमेद अभियाना मार्फत त्यांना कर्ज प्राप्त करून दिले. माझा गटाला १००००० रु. कर्ज प्राप्त करून त्या कर्जाच्या साह्याने गटातील सर्व महिलांना व्यवसाय करण्यास सांगितले.आता माझा गटातील महिला कुकुट पालन ,भाजीपाला लागवड आणि विक्री व मशीनकाम हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे.


    तसेच गटाला १५००० रु. फिरता निधी मिळाला. त्या निधीचा वापर आम्ही आमच्या व्यवसायात केला. आता आमच्या गटातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आता गटातील सर्व महिला मिळून काहीतरी व्यवसाय करू.


    आज उमेद अभियाना मार्फत आमच्या गावात गट स्थापन झाले आहेत. माझा सोबत तीन ICRP (प्रेरिका) काम करत आहेत. माझा गावाचा विकास हा उमेद उमेद अभियाना मुळे होत आहे.आम्ही सर्व ICRP (प्रेरिका) गटांच्या व गावाच्या विकास साठी जोमाने प्रयत्न करत आहोत.


    समर्थ कृपास्वयंसहायता समुह

    उमेद अभियान कल्याण –

  • गटाचे नाव - समर्थ कृपा स्वयंसहायता समुह
  • गटाचा पत्ता – मु.पो.नडगाव ,ता.कल्याण,जि.ठाणे.
  • गटाची स्थापना –१३/१२/२०१०
  • बँकेचे नाव –महाराष्ट्र ग्रामीण बँक
  • खाते क्र .- 55620037471
  • अध्यक्ष नाव – सौ.जयवंती जयवंत लोणे
  • मो.न.- 9096472975
  • प्रस्तावना–

    सौ.जयवंती लोणे या नडगाव गावातील रहिवासी आहेत.नडगाव हे गाव कल्याण तालुक्यातून खडवली स्टेशन पासून ५ km अंतरावर आहे. या गावातील लोणे पाडा येथे सौ.जयवंती लोणे यांचे साधारणतः १८ वर्षा पूर्वी लग्न झाले.

    उमेद अभियाना मार्फत माहे ऑगस्ट २०१४ मध्ये गावात राऊड घेण्यात आला. त्या वेळेस गट म्हणजे काय गटाचे महत्व काय या संदर्भात उमेद मार्फत माहिती देण्यात आली. हि माहिती आपल्या उपयोगाची आहे.तसेच यातून आपला विकास होऊ शकतो. या उदिष्टा ने जयवंती समर्थ कृपा या गटाच्या सदस्य झाल्या. सुरवातीला त्यांच्या घरून विरोध झाला. पण या विरोधाला न जुमानता त्यांनी त्यांच्या घरच्याची मानसिकता बदली व गटामध्ये बचत करू लागली.त्यानंतर उमेद मार्फत CRP ची माहिती देण्यात आली त्यावेळेस आपण या अभियाना मध्ये काम करू शकतो. महिलांना मार्गदर्शन करू शकतो. ज्यामुळे महिलांचा फायदा होईल. हि धारणा मनात घेऊन ऑक्टोबर २०१४ मध्ये उमेद अभियाना सोबत CRP या पदावर काम करण्यास तयार झाल्या व तेथूनच त्यांच्या आयुष्यात बदल होण्यास सुरुवात झाली.

    गटात येण्यापूर्वीची स्थिती –

    जयवंती ताई गावामध्ये अपुर्या मानधनावर आशा वर्करच काम करत होत्या.तसेच त्यांनी घर बांधण्यासाठी बाहेरून कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तुटपुंजी पगार व कर्ज परतफेड करणे या मध्ये ताळमेळ घालेने कठीण झाले होते. शेतातून कोणत्याही प्रकारची मदत त्यांना होत नव्हती. त्यातच वर्ष २०१२ मध्ये शेती मध्ये त्यांना भरपूर नुकसान झाले व त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढतच गेला. कर्जाचा बोजा वाढतच जात असून कर्ज कमी करण्याचा पर्याय दिसत नव्हता. अशा वेळी उमेद मार्फत गटाचे महत्व पटवून देण्यात आले. हि माहिती जयवंती ताईना पटली व त्यांनी गटात यायचा निर्णय घेतला.

    गटात आल्या नंतरची स्थिती –

    ऑगस्ट२०१४ मध्ये उमेद अभियाना तर्फे गाव मध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये समर्थ कृपा गटामध्ये जयवंती लोणे सामील झाल्या तसा हा गट २००६ साली स्थापन झालेला पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे हा गट २००९ ला बंद झाला. परंतु उमेद अभियाना मार्फत मार्गदर्शन झाल्या मुळे हा गट


    २०१४ साली पुन्हा सुरु करण्यात आला. समर्थ कृपा गटाच्या खात्यावर २७७९६ रु. शिल्लक होते. परंतु त्या पैशाचा वापर महिला करत नवत्या.जयवंती ताई यांना अभियानाची दशसुत्रीची माहिती मिळाली व त्यांनी गटातील पैसे कसे वापरले पाहिजे या संदर्भात चर्चा केली व ५००० रु. गटातून घेतले आणि त्यांना पैशाची मदत झाली. तसेच त्यांनी CRP बनून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना गावामध्येकाम करताना खूप त्रास सहन करावा लागला. गावातील राजकारण त्यामुळे नवीन गट तयार करताना खूप त्रास सहन करावा लागला. तरी त्यांनी विरोधाला न जुमानता चिकाटीने काम करू लागल्या. व आज नडगाव या गावामध्ये ३५ गट तयार झाले असून चांगल्या पद्धतीनी गट सुरु आहेत.


    जानेवारी २०१५ मध्ये उमेद RSETIमार्फत योग्य पद्धतीने शेती केली तर उत्पनामध्ये दुपटीने वाढ होऊ शकते अशी माहिती मिळाली व त्यांनी त्यांच्या व इतर गटातील गरीब ४० महिलांना एकत्र करून भाजीपाला लागवडीची ट्रेनिंग देण्यात आली व गटातील महिलांनी भाजीपाला लागवड केली.तसेच स्थानिक बाजारात हा माल विक्री केला जातो. त्यातून मिळनाऱ्या पैस्या मधून त्याच्या कुटुंबाला पण मदत होते. गटातील पैसा अपुरा पडत असल्यामुळे व बाहेरून व्याजदर अधिक असल्याने जयवंती ताईनी त्यांच्या व बाकीच्या गटाचे १ ते ३ लाख रुपया पर्यतचे कर्ज प्रकरणे उमेद मार्फत मंजूर करून घेतली. या कर्जा अंतर्गत शेती साठी कुंपण,बियाणे खरेदी या गरजा पूर्ण करून घेतल्या. नंतर जयवंती ताईच्या समर्थ कृपा गटाने ३००००० लाख कर्ज घेऊन शेती साठी कुपन करून घेतले. तसेच पाईप लाईन करून घेतली.त्यामुळे शेती मध्ये सुधारणा झाली आहे.


    तसेच नडगाव येथील ग्रामसंघाला कृषी मार्फत ७ लाखाची औजारे देण्यात आली. त्यामध्ये ट्रक्टर देण्यात आले.


    जानेवारी २०१६ मध्ये समर्थ कृपा गटाला कोकण विभागातून राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जयवंती ताईना मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते श्री शक्ती


    पुरस्कार देण्यात आला.CRPचे काम करत असतानाच उमेद अभियाना मार्फत त्यांची CTCकरिता निवड करण्यात आली आहे. जयवंती ताईचे काम बघून गटातील इतर महिला पण जोमाने कामाला लागल्या आहेत.

    Samruddhi loksacnhlit sadhan Kendra shahapur

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    नाव

    नंदा वेखंडे

    २.

    वय

    ५२

    ३.

    लिंग

    स्त्री

    ४.

    जा

    obc

    ५.

    धर्म

    हिंदू

    ६.

    गाव

    बोरशेती

    ७.

    पत्ता

    मु बोरशेती पो शहापूर तालुका शहापूर जिल्हा ठाणे

    ८.

    तालुका

    शहापूर

    ९.

    जिल्हा

    ठाणे

    १०.

    शिक्षण

    ७ वी

    ११.

    व्यवसाय

    भाजीपाला लागवड

    १२.

    मोबाईलक्र.

    ९१४६८२९९६२


    स्वयंसहाय्यता समुहाचा संपूर्ण तपशील –

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    SHG चे नाव

    श्री समर्थ

    २.

    SHG मध्ये आल्याची दिनांक

    फेब्रुवारी २०१४

    ३.

    SHG मधील पद (वर्तमानातील)

    अध्यक्ष

    ४.

    गांव

    बोरशेती

    ५.

    ग्रामसंघाचे नाव

    न्यू क्रांती

    ६.

    तालुका

    शहापूर

    ७.

    जिल्हा

    ठाणे

    ८.

    SHG च्या अध्यक्षांच्या मोबाईल क्रमांक व नाव

    नंदा वेखंडे ९१४६८२९९६२

    ९.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचे नाव

     

    १०.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचे पद

     

    ११.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर

     

    १२.

    उमेदमध्ये SHG आल्याची दिनांक

    फेब्रुवारी २०१५

    केस स्टडीच्या कुटुबांचा तपशिल –

    नाव

    नाते

    वय

    लिंग

    शिक्षण

    व्यवसाय

    मिळकत / इनकम

    धर्मा वेखंडे

    पती

    ६०

    पुरुष

    १० वी

    सेवा निवृत्त

    १५०००

    अविनाश वेखंडे

    मुलगा

    २६

    पुरुष

    १५वी

    नोकरी

    १२०००

    अस्मिता  वेखंडे

    सून

    २१

    स्त्री

    १५वी

    नोकरी

    ५०००


    उमेदच्या सहकार्या विषयी –

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    उमेदमध्ये येण्यापूर्वीचे उत्पन्न

    जमीन

    व्यवसाय

    लघुउद्योग

    २.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (शेतीविषयक)

     

    ३.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (शेतीविषयक)

    २००००

    ४.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (व्यवसाय)

    ६००००

    ५.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (इतर)

    ६.

    सद्यस्थिती मध्ये चालू असलेले व्यवसाय, शेती, शेतीपूरक व्यवसाय, लघुद्योग किंवा इतर काही नवनिर्मिती / प्रयोग

    भाजीपाला लागवड मोगरा लागवड

    देण्यात आलेले प्रशिक्षण

    दशपर्णी व जीवामुर्त बनविणे

    कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

    ८००००

    कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

     

    १०

    कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

     

    ११

    आवश्यक कच्चा माल

    बियाणे खात औषधे

    १२

    संपूर्ण (वार्षिक / प्रतीमहा) केलेली गुंतवणुक

    ४४९००

    १३

    मिळालेले उत्पन्न

    १२१०००

    १४

    मिळालेला नफा

    ४५६००

    १५

    इतर संस्थाकडून मिळालेले सहकार्य

     

    १६

    कुटूंबाकडून मिळालेले सहकार्य तसेच विरोधी ?

    व्यवसाय करण्यासाठी मदत करतात


    उमेदच्या सहकार्या विषयी –

    .क्र.

    क्षेत्र

    नमूद करावयाचे मुद्दे

    १.

    वैयक्तिक

    स्वताच्या कुटुंबात मान सन्मान मिळाला,निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाला

    २.

    सामाजिक

    ग्रामसभा ,ग्रामस्वच्छता,यासारख्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली

    ३.

    शैक्षणिक

    -

    ४.

    आर्थिक

    व्यवसाय सुरु करण्यासाठी उमेद कडून आर्थिक सहकार्य मिळाले .

    ५.

    सांस्कृतिक

    क्रीडास्पर्धामध्ये सहभाग घेता आला

    ६.

    राजकीय

    ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली

    ६.

    राजकीय

    -

    ७.

    व्यक्तिमत्वविकास

    स्वताचे मत सर्वांसमोर मांडण्याचे धाडस निर्माण झाले ,सभेमध्ये बोलता येऊ लागले .


    केस स्टडीची मूलभूत माहिती –

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    नाव

    संगीता हिरामण पाटील

    २.

    वय

    ३८

    ३.

    लिंग

    स्री

    ४.

    जात

    कुणबी

    ५.

    धर्म

    हिंदू

    ६.

    गाव

    दहिवली

    ७.

    पत्ता

    मु.दहिवली,पो. आल्यानी  ता. शहापूर

    ८.

    तालुका

    शहापूर

    ९.

    जिल्हा

    ठाणे

    १०.

    शिक्षण

    १२

    ११.

    व्यवसाय

    शेती

    १२.

    मोबाईलक्र.

    ९२६०५९७३७९


    स्वयंसहाय्यता समुहाचा संपूर्ण तपशील –

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    SHG चे नाव

    ओम साई  महिला बचत गट

    २.

    SHG मध्ये आल्याची दिनांक

    ४/३/०७

    ३.

    SHG मधील पद (वर्तमानातील)

    अध्यक्ष

    ४.

    गांव

    शेंद्रून

    ५.

    ग्रामसंघाचे नाव

    नवकिरण ग्रामसंस्था दहिवली 

    ६.

    तालुका

    शहापूर

    ७.

    जिल्हा

    ठाणे

    ८.

    SHG च्या अध्यक्षांच्या मोबाईल क्रमांक व नाव

     संगीता पाटील ९२६०५९७३७९

    ९.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचे नाव

    संगीता पाटील

    १०.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचे पद

    अध्यक्ष

    ११.

    केस स्टडी लिहिलेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर

    ९२६०५९७३७९

    १२.

    उमेदमध्ये SHG आल्याची दिनांक

    १/४/१४  


    केस स्टडीच्या कुटुबांचा तपशिल –

    नाव

    नाते

    वय

    लिंग

    शिक्षण

    व्यवसाय

    मिळकत / इनकम

    संगीता पाटील

    स्वत

    ३८

    स्त्री

    १२

    शेती कुकुट पालन/ कृषी सखी

    मासिक ७०००

    हिरामण पाटील

    पती

    ४१

    पुरुष

    शेती/ नोकरी

    मासिक १५०००

    सौरभ पाटील

    मुलगा

    १८

    पुरुष

    १३

    शिक्षण

     

    गौरव पाटील

    मुलगा

    १७

    पुरुष

    १२

    शिक्षण

     

    कस्तुरी पाटील

    मुलगी

    स्त्री

    शिक्षण

     


    उमेदच्या सहकार्या विषयी –

    .क्र.

    विषय

    तपशील

    १.

    उमेदमध्ये येण्यापूर्वीचे उत्पन्न

    १८०००० वार्षिक

     

    २.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (शेतीविषयक)

    भाजीपाला विषयक प्रशिक्षण

    परसबाग विषयी प्रशिक्षण

    ३.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (शेतीविषयक)

    मोगरा लागवड प्रशिक्षण

    ४.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (व्यवसाय)

    कुकुट पालन/ मोगरा लागवड

    ५.

    उमेदमध्ये मिळालेली मदत (इतर)

    mlp निधी

    कृषी  सखी म्हणून निवड

    ६.

    सद्यस्थिती मध्ये चालू असलेले व्यवसाय, शेती, शेतीपूरक व्यवसाय, लघुद्योग किंवा इतर काही नवनिर्मिती / प्रयोग

    भातशेती

    कुकुटपालन

    मोगरा लागवड

    देण्यात आलेले प्रशिक्षण

    कुकुट पालन, मोगरा लागवड

    बँक कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

    १७५०००  परतफेड १३१००० 

    गटातून अंतर्गत कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

    १०५००  परतफेड पूर्ण

    १०

    mlp कडून घेतलेले कर्ज आणि परतफेड – किती ?

    ११

    आवश्यक कच्चा माल

    बियाणे खते /

    पिल्ले खाद्य

    १२

    संपूर्ण (वार्षिक / प्रतीमहा) केलेली गुंतवणुक

    २००००

    १३

    मिळालेले उत्पन्न

    १२२००० 

    १४

    मिळालेला नफा

    १०२०००

    १५

    इतर संस्थाकडून मिळालेले सहकार्य

     

    १६

    कुटूंबाकडून मिळालेले सहकार्य तसेच विरोधी ?

    कुटुंबाकडून सहकार्य मिळाले


    उमेदच्या सहकार्या विषयी -

    .क्र.

    क्षेत्र

    नमूद करावयाचे मुद्दे

    १.

    वैयक्तिक

    बचत गट आर्थिक मदत

    २.

    सामाजिक

    बचत गटाच्या अध्यक्ष  या माद्यमातून नेतृत्वाची संधी

    ३.

    शैक्षणिक

    विशेष उपजीविका  प्रकल्प माध्यमातून शेती/ मोगरा लागवड आणि कुकुटपालन  बाबत माहिती

    ४.

    आर्थिक

    बचत गट आणि cif आणि बँक  मधून आर्थिक मदत

    ५.

    सांस्कृतिक

    --

    ६.

    राजकीय

    ---

    ६.

    राजकीय

     

    ७.

    व्यक्तिमत्वविकास

    बचत गटाच्या माद्यमातून नेतृत्वाची संधी

    १.यशोगाथा

  • गावाचे नाव –साई
  • महिलेचेनाव- सौ संजीवनी लालचंद भोपी
  • समूहाचे नाव- मनस्वी स्वयंसहय्यता गट
  • समूह स्थापना दिनांक-२६ जानेवारी २०१०
  • समूहाची एकूण सदस्यसंख्या -१२
  • समूहाची एकूण बचत- ८४०००
  • प्राप्त फिरता निधी-१५०००- ३१ मार्च २०१७
  • प्राप्त बँक अर्थसाह्य- १०००००
  • प्रत्येक महिन्याची बचत-२००
  • वर्षाला एकूण बचत-२४००
  • मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे बचत गट म्हणजे काय हेच आधी माहित नव्हते आणि शिक्षण असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही याची खंत वाटत होती एकदा गावात उमेद अभियानाच्या मदतीने वार्धिनी राउंडने स्वयंसहाय्यता गटाची निर्मिती केली व त्याच्या सभांना मि न बोलावता जायचे व २०१६ मध्ये मानधन मिळत नसताना सुद्धा एक समाजसेवा म्हणून मी गटाची निर्मिती करत राहिले नंतर एक दिवस सर्व गटातील १०० ते १५० महिलांनी मिळून माझी प्रेरिका म्हणून निवड केली आणि माझा कामातला आनंद वाढत गेला व नंतर दर आठवडी गटाच्या बैठका घेणे ,त्याची नियमित बचत होते का ते पाहणे ,त्यांना बँक खाते ओपन करून देणे इत्यादी गटांची कामे पाहत होते दशसुत्रीचेपालन कसे करायचे याची गटांना व्यवस्थित माहिती देणे ,इत्यादी कामे करत होते तसेच गटातील महिलांना शासकीय योजनेची ग्रामपंचायत मार्फत माहिती देणे जेव्हा १५ ऑगस्ट २०१७ ला ग्रामसभेत सरकारमान्य रेशनिंग दुकानाचा जाहीरनामा झाला तेव्हा त्यात २६ जानेवारी २०१८ रोजी माझ्या मनस्वी स्वयंसहाय्यता गटाची त्यात उत्कृष्ट गट म्हणून निवड झाली आणि त्यातून आम्ही गटामार्फत रेशनिंग दुकान चालू केले व त्त्यातून आम्हाला एक किलो धान्यामागे एक रुपया मिळत आहे व आमच्या उत्पादनात वाढ होत आहे आता आम्हाला आमचे अर्थसाह्य वाढण्याचा एक मार्ग मिळाला आहे एक नवी दिशा मिळाली आहे कुठेतरी आपल्या शिक्षणाचा व समाजसेवा करण्याचा एक फायदा झाला असे आनदाने वाटू लागले आहे तसेच या सर्व गोष्टी उमेद अभियानामार्फत जेव्हा आम्ही स्वयंसहाय्यता गटात सामील झालो तेव्हा शक्य झाल्या आहेत त्यांच्या सहकार्य व मदतीनेच आम्ही स्वावलंबी बनलो आहोत आम्हाला समाजात गरीबितून एक नवीन जीवन जगण्याची उमेद मिळाली आहे एक प्रेरणा मिळाली आहे

    २ .यशोगाथा

  • गावाचे नाव –मांगरूळ
  • महिलेचे नाव –रोशना निलेश पाटील
  • समूहाचे नाव –श्री कृपा स्वयंसहाय्यता गट
  • समुह स्थापना दिनांक -१७/.११ /.२०१७
  • समूहाची एकूण सदस्य संख्या -१२
  • समूहाची एकूण बचत -७८०० रु
  • प्राप्त फिरता निधी रक्कम व वर्ष -१५००० ,दिनांक ०३ /०४/२०१८
  • प्रत्येक महिना बचत रक्कम -१२०० रु
  • प्रती वर्ष -१४४०० रु

  • माझे शिक्षण डी.एड झाले असून मी स्वयंसहाय्यता गटात येण्याअगोदर घरीच होते नंतर एका खाजगी शाळेत मी अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करू लागले .तरीपण आपण काहीतर वेगळे करून दाखवावे जेणेकरून आपले अर्थसाह्य वाढेल असे वाटत होते दि.१७/११/२०१७ रोजी आमच्या गावात उमेद अभियानाअंतर्गत वर्धिनी राउंड आला आम्ही स्वयंसह्यता मध्ये सामील झालो आठवड्याला आम्ही नियमितबैठक घेवू लागलो आठवडी २५ रु याप्रमाणे प्रती महिना १००रु सर्व महिला बँकेत जमा करू लागलो दशसुत्रीचे पालन आम्ही सर्व महिला करू लागलो आमच्या सर्व महिलांचा गटात आल्यापासून समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे सर्व कार्यक्रमला आंम्ही हजर असतो त्यातून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे असते आम्ही एकदा महालक्ष्मी सरस कुर्ला येथे गेलो अनेक गटातील महिलांनी त्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टऑल मांडले होते ते पाहून आम्ही खूप भारावून गेलो व आपण हि काहीतरी वेगळे करायचे व स्वावलंबी बनून दाखवायचे हा निर्णय घेतला परंतु तो मार्ग आम्हाला अजून सापडला नव्हता जेव्हा ८ मार्च जागतिक महिला दीन होता तेव्हा आम्ही सर्व गटातील महिला उमेद अभियानाअंतर्गत मुंबई विध्यापीठ येथे अस्मिता योजनेचा शुभारंभासाठी गेलो तेव्हा तेथे ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे ,मुख्यमंत्री फडणवीस ,सिनेस्टार अक्षय कुमार उपस्तीत होते त्यांच्या शुभ हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला तेव्हा आम्हाला हि संकल्पना खूप आवडली ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींसाठी अंत्यत माफक दरात स्यानिटरी न्यापकिन पुरविण्याची योजना सरकारने हाती घेतली होती हे काम स्वयंसहाय्यता गटामार्फत व्हावे म्हणून हे काम गटांना सोपवण्यात आले आणि त्यांना हे काम कसे करायचे हे समजावून दिले व सर्व सविस्तर चर्चा करण्यात आली नंतर आम्ही परत घरी आलो तेव्हा आमची एक मासिक बैठक घेण्यात आली व आरोग्याच्या दृष्टीने हि योजना किती लाभदायक आहे हे पटवून दिले गेले आणि आमच्या गटासाठी आम्ही एका बोक्स ची ओर्डर केली व गटातील महिलांनाच त्याची विक्री केली व त्यातून आम्हला ६७२ रु चा नफा मिळाला.नंतर आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकारी कडून असे सांगितले कि,कोकण भवन येथे वेंडिंग मशीन बसविण्यात येणार आहे आणि हा लाभ स्वयंसह्यता गटांना देण्यात येणार आहे हि आमच्या साठी एक सुवर्णसंधी होती आणि हा लाभ आमच्या गटाला मिळावा असे ठरविले आणि अंबरनाथ पंचायत समिती येथे आम्ही आलो व प्रतीक्षा आगिवले म्यडमला भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि नंतर स्टेटचे ज्योती निम्बोरकर म्याडम व जिल्ह्याचे स्मिता मोरे म्याडम यांनी अंबरनाथ पंचायत समिती येते येवून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले व नंतर आम्ही सर्व गटातील महिलांनी त्यसाठी तयारी दाखवली .मग पुढील चर्चेसाठी आमच्या गटातील महिलांना स्टेटला बोलावण्यात आले आणि पुन्हा आम्हाला विचरण्यात आले तुमचा निर्णय ठाम आहे का ,मग आम्ही एकमताने ठरवून हो म्हणालो व नंतर वेंडिंग मशिन चे प्रात्यक्षिक गटातील सर्व महिलांना देण्यात आले व ते मशीन बसवण्याचे ठिकाण आम्हला दाखवण्यात आले चहा व जेवण्याची सोय केली होती .या गोष्टी अनपेक्षितपणे घडत होत्या व नंतर आमच्या गटातील सर्व महिलांनी १००००रु चा चेक मशिनच्या ओनरला देवू केला व आमच्या गटाचे पैसे या वेंडिंग मशीन मध्ये गुंतवले व एक नवीन व्यवसाय गटाच्या मार्फत सुरु केला .त्यातून स्वावलंबनाची एक नवी दिशा ,एक नवी आशा मिळाली आहे