ठाणे जिल्हा परिषद

           

हात धुवा मोहिम

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वं शाळांमध्ये ‘हात धुवा’ मोहिम राबविण्यांत आली.

काही अनुभव सुखवणारे (Good Response):-

आदिवासी गावामध्ये सरपंच व ग्रामस्थानी स्वत: पुढाकार घेवुन एकत्रितरित्या साहित्य खरेदी करुन मोठया प्रमाणावर शौचालय बांधकाम करण्यात आले.

ग्रामपंचायत नांदवळ यशोगाथा:-
  • नांदवळ ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 262 कुटूंबे असुन त्यातील 17 कुटूंबांकडे शौचालय असल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंब हि उघडयावर शौचास जात होती.
  • प्रथम नांदवळ ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लब ऑफ हिल हया सामाजिक संस्थेने भेट देऊन गावातील कुटूंबांची अडचण पाहुन तेथे शौचालय बांधकाम करणेसाठी पुढाकार घेतला.
  • शौचालय बांधकाम करणेसाठी प्राधान्याने युनिसेफ व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ठाणे यांच्या संयुक्त्‍ प्रय त्नाने तांत्रिक मार्गदर्शन व लोकसहभाग मिळविण्यासाठी सहभाग दर्शविला.
  • रोटरी क्लब ऑफहिल यांचे निकषानुसार लाभार्थी हिस्सा 3000/- रु तर रोटरी क्लब ऑफ हिल यांचे 15000/- असे एकूण 18000/- रुपयांत शौचालय बांधकाम करण्यात आले.
  • रोटरि क्लब ऑफ.हिल या संस्थेमुळे एकूण 161 शौचालय बांधकामे पुर्ण करण्यात आली.

  • ग्रामपंचायत कोठारे ,तालुका शहापुर यशोगाथा:- ( एक अदिवासी महिलेने घेतलेला पुढाकार)

  • बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 525 कुटूंबे असुन त्यातील 299 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. आदिवासी डोंगराळ भाग असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची उदासिनता दिसुन आली. मोठया प्रमाणात हि कुटूंब उघडयावर शौचास जात होती.

  • गावात आदिवासी सरपंच श्री मधुकर भसाडे व महिला उपसरपंच श्रीमती सखुबाई भस्मा यांच्या प्रयत्नाने एकूण 75 शौचालय बांधकामे पुर्ण झाली आहेत. आजमितीस उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.

  • ग्रामपंचायत खरीवली,तालुका शहापुर यशोगाथा:- (एका उपसरपंचाने शौचालयाकरीता केलेला सहकार्य )

  • बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 372 कुटूंबे असुन त्यातील 311 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. खरीवली स ही ग्रुप ग्रामपंचायत असुन यात जमिन पाण्याची (दलदलीची) व अडचणीची असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची काम करतांना प्रथम सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा व तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगट तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन उपसरपंच श्री योगेश कष्णा भोईर यांनी पुढाकार घेऊन गावात विट,सिमेंद,रेती, शौचालय भांडी ,सिमेंट पत्रे ,बेसीन व गवंडी उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली व कामास गति मिळाली.

  • ग्रामपंचायतीमध्ये एकूण आजमितीस 181 कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगति पथावर आहेत.

    ग्रामपंचायत चरगाव व आंबेशीव ,तालुका अंबरनाथ यशोगाथा:- ( महिला ग्रामसेवकाचे प्रयत्न पण योजनेकडे गावक-यांची पाठ )
  • ग्रामपंचायत चरगाव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 611 कुटूंबे असुन त्यातील 390 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती भोईर यांनी आदिवासी सरपंच यांच्या मदतीने स्वत: साहिल्य खरेदीकरुन शौचालय बांधकामास सुरुवात केली यात गावाचा कोणताहि सहभाग नसतांना 310 कुटूंबांकडे शौचालय बांधकाम करण्याचे काम केले.
  • योजना शासनाची आहे त्यामुळे बांधकामे शासनाने करावी अशी गावक-यांची धारणा आहे , परंतु ग्रामसेवकांचे योजना राबविण्यासाठी प्रयत्न
  • ग्रामपंचायत आंबेशीव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 321 कुटूंबे असुन त्यातील 244 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. त्यापैकी 150 कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती चव्हाण यांनी प्रयत्न शौचालय बांधकामे पुर्ण केली व पुढील कामे प्रगतिपथावर आहेत.