अधिकार
अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार.–
- अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .
- क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.
- इ) वेतन निश्चिती व भविष्य निर्वाह निधी कर्ज मंजुरी करणे.
- ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे
प्रशासकीय
- 1.विभागामधील वर्ग-3 व 4 कर्मचाऱ्यांची
आस्थापना
- 2.विभागा अंतर्गत असलेल्या कर्मचा-यांच्या
आस्थापना विषयक बाबी
- 3.विभाग अधिनियम संबधित संवैधानिक कामे.
- 4.विभागाशी संबधित लेखा विषयक बाबी.
- 5.विभागाशी संबधित आस्थापना विषयक तक्रारीची चौकशी
- 6.विभागातील आहरण व संवितरण
- 7.विभागातील आहरण व संवितरण.
- 8.विभागांमार्फत चालु असलेल्या कामांची तपासणी करणे.
- 9.स्थानिक निधी लेखा व सहा.लेखापाल्याचे कडील
लेखा परिक्षण आक्षेपांची पूर्तता करुन घेणे.
पंचायत समिती सभापती यांचे अधिकार - –
1) पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-यांकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरणपत्र, हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.
2) गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेस किंवा जिल्हा परिषदेने अथवा पंचायत समितीने अथवा तिच्या निदेशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम विकास परियोजना, गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.