ठाणे जिल्हा परिषद

           

पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत नाविन्यपुर्ण कामांची माहिती.

*सामान्य प्रशासन विभाग:-

1) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय क्र. संकीर्ण 2517/ प्र.क्र. 372/ 17/आस्था -1 बांधकाम भवन , मर्झबान रोड, फोर्ट मुंबई 400001 दिनांक :3 ऑक्टोबर 2017 अन्वये “ झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ”(स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) जिल्हा परिषदा, पंचायत समिती, कार्यालयीन कामाकाजाची कार्यपध्दती अंतर्गत

अ):- कार्यालयातील दप्तर अभिलेखे अद्ययावत करून योग्य पध्दतीनेकार्यालयातील तसेच अभिलेख कक्षातील अभिलेखांचे निंदणीकरण, वर्गीकरण व अद्यावतीकरण करण्यात आले आहे.

ब):-कार्यालयात प्राप्त आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी “ झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ” या कार्यपध्दतीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली आहे.

2) पंचायत समिती अंतर्गत सौर उर्जा संच बसविल्यामुळे विज बिलाची बचत झाली आहे.

3)शासन निर्णय क्रं.झेडपीए-2021/प्र.क्रं.35/पं.रा.1,दिनांक 6ऑक्टोबर 2021 अन्वये स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव अंतर्गत 1) कार्यालयीन लोगो वापरणे 2) अभिलेख वर्गीकरण3)सेवापुस्तक अदयावत करणे 4)लेखा परिक्षण मुद्ये निकाली काढणे 5)तपासणी मुद्ये निकाली काढणे 6)परिसर स्वच्छता 7)नागरी तक्रार निराकरणे करणे


ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,पंचायत समिती अंबरनाथ

अ}कामाचे नांवः-मौजे हाजीमलंगवाडी –पहाड येथील लंबी बावडीचे बळकटीकरण व वाटरप्रुफिंग करणे ता.अंबरनाथ

अंदाजपत्रकिय रक्कम :- रु.4034624/-

लेखाशिर्ष :- पर्यटन स्थळ विकास मुलभुत सुविधा(3452-2052)

कार्यादेश क्रमांक :- ठाजिप/ग्रापापुवि/निविदा/334/222 दिनांक 08/04/2022

कामाची सदयस्थिती:- काम पुर्ण

सदयस्थिती एकुण पाण्याचा साठा:-लंबी बावडी-33,52,910लि.(3.35MLD)

ब}कामाचे नांवः-मौजे हाजीमलंगवाडी–पहाड येथील बंधा-याचे बळकटीकरण व वाटरप्रुफ़िंग करणे ता.अंबरनाथ

अंदाजपत्रकियरक्कम :- रु.28,27,744/-

2) लेखाशिर्ष :- पर्यटनस्थळविकासमुलभुतसुविधा(3452-2052)

3) कार्यादेशक्रमांक :- ठाजिप/ग्रापापुवि/निविदा/333/222 दिनांक08/04/2022

4) कामाचीसदयस्थिती:- कामपुर्ण

5) सदयस्थिती एकुण पाण्याचा साठा बंधारा:- 108,24,000लि.(10.82MLD)

सर्वसाधारण माहिती

अंबरनाथ तालुक्यातीलग्रुप ग्रामपंचायत हाजीमलंगवाडी येथील पहाड येथे मुख्य दर्गाह परिसरात एकुण ३५० कुटंबे वास्तव करित असुन १७०० एवढी लोकसंख्या आहे.तसेच दररोज २००० ते ३००० श्राद्धाळु भेट देतात.पहाड येथील ग्रामस्थ अस्तित्वातील विहिरीं व १ आस्ट्रिलियन टाईप पाणी साठवण टाकीतुन पाणी पिण्याकरीता घेतात.तसेच दरवर्षी उरुसाच्या दिवशी ३ ते ४ लाख पर्यटक भेट देत असल्याने पहाड येथील लंबी बावडीतील साठवण केलेले पाणी पिण्यासाठी वापर केला जातो.परन्तु सदरची बावडीच्या तळात व चारही भिंतीत मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने पाणी साठत नव्हते.परिणामी पहाड येथे दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होत होती.

हाजीमलंग पहाड परिसरातील ग्रामस्थांना व पर्यटकांना मुबलक पाणी उपलब्ध होणेकरीता सदरची कामे पर्यटनस्थळ विकास मुलभुत सुविधा या लेखाशिर्ष अंतर्गत मंजुर करण्यात आले आहे.

सदयस्थितीत उपरोक्त दोनही कामे पुर्ण झालेली असुन पहाडावर एकुण 141,76,910 लि. (14.17MLD) पाण्याचा साठा उपलब्ध झालेला आहे.

* शिक्षण विभाग

शिक्षण विभागअंतर्गत नाविन्यपुर्ण कामांची माहिती

1)ज्ञानरचनावादी शाळा -114

2) डिजीटल शाळा -114

3) प्रगत शाळा-103

4) नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येणा-या शाळा -12

5) (दहिवली, नेवाळी, काकडवाल, ना-हेण, उसाटणे, द्वारली ,कासगाव, कान्होर, पिंपळोली, आंबेशिव बु, रहाटोली, मुळगाव)

6) बालिकादिन उपक्रम

7) मुक्त भिंतचित्र

8) आदिवासी गरीब मुलींचा सत्कार

9) विज्ञान प्रयोग केंद्र भेट

10) डिजीटल माध्यमादवारे विदयार्थ्यांना आकाशदर्शन

11) महिला दिन उपक्रम अंतर्गत महिला सक्षमीकरणकरीता किशोरवयीन मुली सायकल रॅली- मुलींना शिकवा देश वाचवा.

12) पालक / विदयार्थ्यांसाठी तक्रार पेटी

13) इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पुस्तके आणि स्वाध्याय वाटप

14)संच मान्यता वाटप

15)तंबाखु मुक्त झालेल्या शाळा 114

16) शिष्य वृत्ती मार्गदर्शन शिबिर आयोजन करणेत आले.

* मग्रारोहयो (MREGS)

1) कुक्कुट पालन कामे करण्यात आले आहे.

2) गाईचे गोठाचे कामे करण्यात आले आहे.

3) घरकुलांचे कामे करण्यात आले आहे.

4) फळबाग लागवड करण्यात आली आहेत.

5) नाडेप काम करण्यात आले आहे.

* बांधकाम

तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत खालीलप्रमाणे कामे मंजूर करण्यात आलेली आहेत

1) मुळगाव येथे खंडोबा मंदिरासमोर संरक्षक भिंत बांधणे

* आरोग्य

आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नाविन्यपुर्ण योजना राबिविण्यात आल्या आहेत.

1) आरोग्य संस्थेच्या कार्यक्षेत्राती मुलांना गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात आली.

*एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकलप अंबरनाथ नाविन्यपूर्ण माहिती

1) शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल पुरवणे

2)मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण

3)महिलांना साहित्य पुरवणे .

4) मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे .

5) विशेष प्राविण्य मिळाविलेल्या मुलींचा सत्कार करणे

* पशुसंवर्धन विभाग नाविन्यपुर्ण उपक्रम

1) जिल्हा परिषद अंतर्गत 50% अनुदानावर सर्वसाधारण गटाकरीता दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येते.

2) विशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जातीच्या शेतक-यांना /ग्रामस्थाना/पशुपालकांना दुधाळ गट व शेळीगट वाटप करणे.

3) राज्य स्तरीय योजने अंतर्गत नाविन्य पुर्ण योजनामार्फत सर्व साधारण अनुसुचित जाती /जमाती संवर्गातील शेतक- यासाठी 50% / 75% अनुदानावर दुधाळ जनावरे / शेळी गट/ 1000 मासल कुकटपक्षी संगोपन करणे .या योजनांचा समावेश आहे

*स्वच्छ भारत मिशन नाविन्यपुर्ण उपक्रम

1)सन2021- 2022 या वर्षेा मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पंचायत समिती, अंबरनाथ अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यात आले.

2)सन 2021- 2022 या वर्षेा मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) पंचायत समिती, अंबरनाथ अंतर्गत 1 युनिट सार्वजनिक शौचालय बांधकाम पुर्ण करण्यात आले.

3)संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या अभियानांतर्गत सन 2020-2021 व 2021-2022 या वर्षामध्ये शासननिर्णयानुसार 28 ग्राम पंचायतीमधील 95 प्रभागामधून 28 उत्कृष्ठ प्रभाग व 4 जि.प.गटामधून 4 उत्कृष्ठ ग्राम पंचायतीची निवड करण्यात आली आहे.

4)साडपाणी घनकचरा व्यवस्थापन - संडपाणी घनकचरा व्यवस्थानांतर्गत सन 2021-2022 मध्ये 1500 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 23 गावांना तांत्रिक व प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे.त्यापैकी 7 कामे पुर्ण करण्यात आलेली आहे.

* महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अंबरनाथ तालुक्यात आजतागायत एकूण 898 महिला स्वयं सहाय्यता समूहाची स्थापना केली असून एकूण 59 महिला ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली आहे, हे सर्व समूह अभियानाच्या नियमाचे पालन करत आहेत तसेच अभियानामध्ये आल्यानंतर महिलामध्ये आत्मविश्वास वाढल्यामुळे महिला छोटया -छोटया व्यवसायाकडे वळल्या आहेत. या स्वयं सहायता समुहाचे गाव पातळीवर वैयक्तीक व गटाच्या तसेच ग्रामसंघाच्या मार्फत परसबागा लागवड, शेळीपालन, कुक्कुट पालन, खानावळ, चर्मउदयोग, रेडीमेड गारमेंटस, पापड व्यवसाय विविध प्रकारचे मसाले, नर्सरी, गांडूळखत, कटलरी,फिनेल, व लिक्विड सोप निर्मिती, पेपर बॅग व फॅन्सी बनवणे, अगरबत्ती व मेणबत्ती बनवणे, हस्तकला व शिल्पकला असे विविध प्रकारचे व्यवसाय असून या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्टया हातभार लावत आहे.

अंबरनाथ तालुकयातील अमृतवेल स्वयं सहायता गटाचा कपडयावर बांटिक प्रिंट हा नाविन्य पूर्ण व्यवसाय असून सदर व्यवसायास आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अभियान प्रयत्नशील आहे.