ठाणे जिल्हा परिषद

           

कर्तव्य :- अ- आर्थिक अधिकार

  • 1.पंचायत समिती मधील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्याचे वेतन, भत्ते व रजा मंजुर करणे.

  • 2.कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतनवाढी मंजुर करणे. विविध प्रकारची अग्रीम मंजुर करणे. महाराष्ट्र जिल्हा

  • अधिकार प्रशासकीय

  • अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबीचे अधिकार

  • अ) अधिकार कक्षेतीलसर्व प्रकारच्या रजा मंजुर करणे .

  • ब) वेतन वाढी मंजुर करणे.

  • क) कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणे.

  • ई) अधिकाऱ्यांच्या/कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकावर सेवा विषयक नोंदी करणे.

गट विकास अधिकारी पंचायत समिती
पंचायत समिती सभापती यांचे कर्तव्ये-

  • 1) पंचायत समितीच्या बैठकी बोलावील, त्या बैठकीचे अध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.

  • 2) पंचायत समितीचे अभिलेखे पाहू शकेल.

  • 3) अंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीने ठराव आणि निर्णय कार्यान्वित करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अधिलेख यांच्या बाबतीत गटात काम करणा-या जिल्हा परिषदाच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कृतींचे पर्यवेक्षण करील व त्यावर नियंत्रण ठेवील.

  • 4) गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत, मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यासंबंधात, राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.