ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय –

  • प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र , पथक , जिल्हा परिषद दवाखाना इ. आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येणा-या आरोग्य सेवा व आरोग्य कार्यक्रमांवर संनियंत्रण करणे.

  • आरोग्य विभागाअंतर्गत संस्थाकडून अहवाल एकत्रित करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

  • आरोग्य संस्थाना औषध पुरवठा ,लस पुरवठा व साधनसामुग्री पुरवठा करणे.

  • आरोग्य संस्थाची देखभाल व दुरूस्ती करणे.

  • आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक व प्रशासकिय बाबी हाताळणे.

  • तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय –

  • प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील कामकाजावर नियंत्रण ठेवणे व कामकाजाचे अहवाल एकत्रीकरण करून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास पाठविणे.

  • प्राथमिक आरोग्य केंद्र –

  • उपचारात्मक सेवा – दैनंदिन रूग्ण तपासणी OPD / IPD कामकाज

  • प्रतिबंधात्मक सेवा – माताबाल संगोपन , कुटूंब कल्याण, साथरोग इ. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

  • जिल्हा परिषद दवाखाना -

  • दैनंदिन रूग्ण तपासणी OPD / IPD कामकाज

  • उपकेंद्र –

  • आरोग्य सेवक (म) , आरोग्य सेवक (पु) मार्फत गृहभेट देणे. प्रत्यक्ष लसीकरण व आरोग्य सेवा जनतेपर्यंत पोहचविणे.