ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा:

यशोगाथा

  • पल्स्‍ पोलिओ कार्यक्रम व AFP सर्वेलन्स्‍ राबवुन अपंगत्वाचे प्रमाण कमी केले.
  • हत्तीरोग दुरीकरण – विशेष मोहिमेमुळे हत्तीरोगाच्या रुग्णसंख्येत घट दिसुन आली.
  • जैविक पध्दतीने गप्पी मासे पैदास केंद्र प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र येथे निर्माण केल्यामुळे हिवतापाचे रुग्ण कमी व मृत्यु कमी झाले आहेत.
  • कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत दोन अपत्यावर शस्त्रक्रिया शिबिरे घेऊन ठाणे जिल्हयातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण.
  • माताबाल संगोपन कार्यक्रमातर्गत माता व बालकांचे लसीकरण करुन माता व बालकांचे मृत्युचे प्रमाण कमी केले.
  • सॅम व मॅम च्या बालकांचे श्रेणीवर्धन केले.
  • MCTS कार्यक्रमामुळे माता व बालकांस दयावयाच्या सेवा अदयावत करुन लाभ दिला.
  • मातृत्व अनुदान व जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातांना अनुदान देवुन संस्थोतील प्रसुतीचे प्रमाण वाढविले.
  • सावित्रिबाई फुले कन्या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाने एक मुलगी किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास प्रोत्साहनपर अनुदान व मुलीच्या नावे NSC चे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
  • जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी या योजनेअंतर्गत गरिब गरोदर मातांची सोनोग्राफी करुन सुरक्षीत प्रसुतीकरिता सहाय्य्‍ देण्याची योजना कार्यान्वित केली.
  • सफाई कामगार यांना शवविच्छेदन करणे करिता प्रोत्साहनपर अनुदान वितरणाची योजना सुरु केली.
  • 24 X 7 साथ नियंत्रण कक्ष स्थापन करुन जलजन्य व इतर आजारांच्या साथ नियंत्रणात व मृत्यु रोखण्यात प्रभावी मार्गदर्शन करुन यश संपादित केले.
  • प्राथमिक आरोग्य्‍ा केंद्रातील बाहयरुग्ण्‍ शुल्क्‍ फी संस्थेच्या बळकटीकरण करणे करिता वापर करणेबाबत महत्वाचा निर्णय मा. मुख्य्‍ कार्यकारी अधिकारी यांनी घेतला.
  • सिकलसेल आजाराचे रुग्ण्‍ शोधुन त्यांच्यावर उपचार व संदर्भ सेवा देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
  • विविध आजारांविषयी जनतेमध्ये जनजागृती करणेसाठी पोस्टर्स, बॅनर्स छपाई करणे व विविध दैनिक वृत्त्‍ापत्रात जाहिरात देण्यात येते.
  • मिशन इंद्रधनुष्य्‍ अंतर्गत लसीकरणापासुन वंचित राहिलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण शिबिरे लावुन संरखित करणे.
  • कायापालट योजनेअंतर्गत लोकांच्या सहभागातुन प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तर उंचावण्यासाठीचे प्रयत्न्‍ करणे.
  • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत माता व बालकांना आरोग्य सेवा मिळवुन देण्यासाठी लाभाथ्याने 102 व 108 टोल फ्रि क्रमांक फिरवल्यास वाहन उपलब्ध्‍ करुन दिला .
  • RBSK राष्ट्रिय बाल स्वास्थ्‍ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वैदयकिय अधिका-यांकडुन बालकांचे अंगणवाडी / शाहेतील बालकांची आरोग्य्‍ तपासणी करुन दुर्धर आजाराचे निदान करुन शस्त्रक्रियेसाइी प्रवृत्त्‍ करुन संदर्भित करणे.

योजनेची यशोगाथा:


गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी, जिल्हा परिषद योजनेची यशोगाथा:


              ठाणे जिल्हा परिषदे मार्फत सा 2015-16 मध्ये गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी, ही नाविण्य्‍पुर्ण योजाना सुरु करण्यात आली. सदर योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या सन 2015-16 मुळ अर्थसंकल्पात र.रु. 1,25,00,000/- इतकी भरीव तरतुद करण्यात आली होती.

योजनेस नविन असल्याने विविध मान्य्‍ता घेण्यासाठी वेळ लागल्याने सदर योजाना माहे ऑक्टोंबर 2015 पासुन प्रत्यक्ष कार्यान्वित झाली.

              माहे ऑक्टोंबर 2015 ते 31 मार्च 2016 पर्यंत एकुण 9441 गरोदर मातांना सोनोग्राफी तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले. त्यापैकी 4980 मातांना खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये व 28 मातांनी शासकीय सोनोग्राफी सेंटर मध्ये सोनोग्राफी तपासणी करुा घेतल्याने गरोदर पणातील संभाव्य धोके, गुंतागुंत वेळीच निदर्शणास आल्याने  त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजाना वैदयकीय अधिका-यांना यश आले. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलणेत अर्भक व माता मृत्य्‍ुाचे प्रमाण कमी झाले असुन संस्थेतील प्रसुतीच्या संख्येत वाढ झाली .

              सदर योजने अतंर्गत प्रती माता र.रु. 600/- असे एकुण 5008 गरोदर मातांना र.रु. 29,90,800 /- धनादेशा द्वारे वाटप करण्यात आले. सदर योजनचे ग्रामीण तसेच सर्व थरातील मातांना लाभ झाल्याने  ही योजाना पुढील वर्षासाठी कायमस्वरुपी सुरु रहावी अशी मागणी सर्व स्तरातुन होत आहे.