ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:


  • जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अखत्यारातील जिल्हा परिषद मालकीच्या व शासनाकडून हस्तांतरीत झालेल्या इमारतींचे बांधकामे व अस्तित्वात असलेल्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.
  • जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे इतर जिल्हा मार्ग व ग्रामिण मार्ग दर्जाचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करीता असतात. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती करीता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत नियतव्यय प्राप्त होतो.
  • जिल्हा परिषदेच्या इतर विभागाकडुन उदा.1) आरोग्य विभाग 2) पशुसंवर्धन विभाग  3) समाजकल्याण विभाग  4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभागव 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वात असलेल्या इमारतींची दुरुस्तींची कामे करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरणकरणे ही कामे प्राधान्याने केली जातात.
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (बाहय भागांचा विकास ) क्षेत्रातील भिवंडी ,कल्याण,अंबरनाथ यातालुक्यातील ग्रामिण भागाचा समावेश आहे.या भागातील रस्ते सुधारणे कामा करीता तसेच ‌गावातील मुलभूत सुविधा सुधारणा व विकास कामाकरीता सदर प्राधिकरणा मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.
  • जिल्हयातील खनिज कर्म मुळे बाधीत झालेल्या रस्ता / इमारती सुधारणा कामा करीता निधी महाराष्ट्र खनिज कर्म विकास निधीतुन शासनाकडुन जिल्हा परिषदेस मिळतो.
  • वित्त आयोग मार्फत ग्रामिण भागातील रस्ते व गावअंतर्गत रस्त्यां करीता निधी जिल्हा परिषदेला दिला जातो.
  • एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडुन आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी भागातील रस्ते व इमारतीं करीता स्वतंत्र निधी उपलब्ध होवून कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा परिषद  बांधकाम मार्फत काम करण्यात येते.