ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा:

यशोगाथा

नाविन्यपूर्ण योजना

योजनेचे नांव :- साखरपाडा नडगांव (जा) ता.शहापूर, जि. ठाणे येथे उपसा सिंचन योजना तयार करणे.

                       नडगांव जागरे ग्रामपंचायती अंतर्गत साखरपाडा हे सुमारे ३५० लोकसंख्या असलेले १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे गांव  दुर्गम भागात डोंगरपठारावर वसलेले आहे. गाव पूर्णपणे पठारावर असल्यामुळे पूर्वीपासून गावाला सिंचनाची कुठलीही सोय उपलध नव्हती..गावाच्या दशिणेस ९५० मीटर अंतरावर लेनाडी नदी वाहते. नदीच्या वरिल भागात  जांभा सिंचन योजना असल्यामुळे नदीस बारमाही पाणी उपलध असते. या नदीतून पाणी उचलल्यास साखरपाडा गावाचे शिवार सिंचनाखाली येऊ शकते अशी कल्पना गावाचे सरपंच श्री. ऩरेश रेरा यांनी मांडली. ते स्वतः साखरपाडा गावाचे रहिवासी असल्यामुळे त्यांनी यात पु्ढाकार घेऊन शेतकर्यांची संकल्प शेतकरी उपसा जलसिंचन सहकारी संस्था स्थापन करून पाटबंधारे खात्याकडून पाणी वापर परवाना  मिळविला. त्यानंतर जिल्हा परिषद ठाणे च्या लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क करून  योजनेचे अंदाजपत्रक बनवून नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत निधी मिळविला.

                   लघु पाटबंधारे विभागामाफत निविदा मागवून सद्यथितीत योजनेचे काम आता पुर्ण करण्यांत आलेले आहे. योजनेसाठी उदभव हा लेनाडी नदीवर विहीर खोदून त्यावर १५ अश्वशक्तीचे दोन पंपसेट बसविण्यांत आलेले आहेत. उ्दभवासाठी खाली बंधारा बांधून अतिरीक्त पाणीसाठा निर्माण करण्यांत आला आहे. ९५० मीटर लांबीची १४० मीमी व्यासाची पिव्हीसी पाईपलाईन टाकण्यांत  आलेली आहे. योजनेतून पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावातील शेतकऱ्यांनी दुबार पिक ( भाजीपाला ) घेण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना आता रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. गावातच रोजगार निर्माण होईल. अशी खूप फायदेशीर व वरदान ठरणारी योजना गावातील सरपंच , सर्व ग्रामस्थ व जिल्हा परिषद ठाणे  यांच्या अथक परिश्रमाने यशस्वी होणांर यात शंका नाही.