ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय

  1. 100 हेक्टर सिंचन क्षमते पर्यंतच्या लघुपाटबंधारे योजनांचे बांधकाम करणे.(उदा.सिंचन तलाव, पाझर तलाव,को.प.बंधारे, पक्के बंधारे, वळण बंधारे)
  2. स्थानिक शेतकरी, ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार नदी / नाल्यांवर बंधारे बांधून परिसरातील सिंचन क्षेत्रात वाढ करणे.
  3. पावसाळयात पडणा-या पावसाचे पाणी अडविल्याने भूगर्भातिल पाण्याच्या पातळीत वाढ होवुन परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.
  4. शेतक-यांना शेतीसाठी, फळबाग तयार करण्यासाठी, भाजिपाला लागवडीसाठी पाणी पुरवठा करणे.
  5. तलावच्या पाण्यावर मत्स्य उत्पादन करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा तयार करणे.त्याद्वारे रोजगार निर्मिती करणे आणि दरडोई उत्पन्न वाढविण्यास सहकार्य करणे.
  6. विभागा अंतर्गत पूर्ण झालेल्या लघु पाटबंधारे योजनांचे जतन करणे आणि साठलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करणे.