ठाणे जिल्हा परिषद

विषयाचे कार्यासननिहाय वाटप:

कलम 4(1) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण  जबाबदारीचे उत्तर दायित्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन

(कामाचा प्रकार/नांव)

  • लघुपाटबंधारे विभागातील सबंधित विभागाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी संबंधित विषयाची संचिका कार्यालयीन अधिक्षक/शाखा अभियंता/सहाय्यक लेखा अधिकारी यांचे मार्फत कार्यकारी अभियंता यांचेकडे अंतिम निर्णय/मान्यतेसाठी सादर करतात.
  • सबंधित विभागाचे कर्मचारी उप अभियंता,जिल्हा परिषद उप विभाग व इतर विभाग यांचेकडून माहिती/अहवाल प्राप्त करुन सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी अनुक्रमे/कार्यालयीन अधिक्षक/सहाय्यक लेखा अधिकारी/शाखा अभियंता व मा.कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद ठाणे यांची आहे.
  • सबंधित विभागाच्या कर्मचा-यांनी त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अद्यावतीकरण करुन ठेवण्याची जबाबदारी खालील कर्मचा-यांची आहे.

 अ.क्रं.

कामाचे स्वरुप

कालावधी/ दिवस

कामांसाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1

2

3

4

5

1.

निवृत्ती वेतन प्रकरणांबाबत अहवाल

एक महिना

सबंधित विभागाचे कर्मचारी

कार्यालयीन अधिक्षक व जिल्हा जलसंधारण अधिकारी,  ल.पा.वि.जि.प.ठाणे हे याबाबत पर्यवेक्षण करतात.

2.

वर्ग-1 अधिका-यांचे त्रैमासिक विवरणपत्र (माहितीबाबत.)

त्रैमासिक

सबंधित विभागाचे कर्मचारी

कार्यालयीन अधिक्षक व जिल्हा जलसंधारण अधिकारी,  ल.पा.वि.जि.प.ठाणे हे याबाबत पर्यवेक्षण करतात.

3.

लघुपाटबंधारे विभागांतील सेवानिवृत्ती प्रकरणांबाबत अहवाल.

एक महिना

सबंधित विभागाचे कर्मचारी

कनिष्ठ प्रशासन अधिकारी व जिल्हा जलसंधारण अधिकारी,  ल.पा.वि.जि.प.ठाणे हे याबाबत पर्यवेक्षण करतात.

4.

कार्यकारी अभियंता यांच्या मासिक दैनंदिनी बाबत.

एक महिना

सबंधित विभागाचे कर्मचारी

कनिष्ठ प्रशासन अधिकारी व जिल्हा जलसंधारण अधिकारी,  ल.पा.वि.जि.प.ठाणे हे याबाबत पर्यवेक्षण करतात.

5.

ग्रामस्थांची सनद त्रैमासिक अहवाल.

तीन महिने.

सबंधित विभागाचे कर्मचारी

कनिष्ठ प्रशासन अधिकारी व जिल्हा जलसंधारण अधिकारी,  ल.पा.वि.जि.प.ठाणे हे याबाबत पर्यवेक्षण करतात.