ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती :


विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

प्रकल्प शाखा

जल जीवन मिशन कार्यक्रम

            केंद्र शासनामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत सन 2024 पर्यंत 55 लीटर दरडोई दर दिवशी प्रमाणे 100 टक्के कुटंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.   100 टक्के नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट साध्य करणेसाठी गावामधील आवश्यक उपाययोजना उदा. उद्भव निर्मिती, वाढीव पाईपलाईन, नवीन स्वतंत्र योजना, नवीन प्रादेशिक योजना व सौर उर्जेवर आढारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहेत.  त्या अनुषंगाने पुढील 4 वर्षांसाठी महसूल गावनिहाय गाव कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.  व सदर कार्यक्रमाची कार्यप्रणाली व निकषाबाबत शासनाच्या प्राथमिक मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

तालुका

 गावांची संख्या

 घरांची संख्या

31/3/2022 पर्यत नळ जोडणे संख्या

 दि. 1.4.2022 रोजी शिल्लक  उद्यिष्ठ

   सन 2022-23 मध्ये साध्य

अंबरनाथ

64

20723

12000

8723

185

भिवंडी

220

95928

62302

33626

0

 कल्याण

83

29173

21771

7402

363

मुरबाड

203

40634

11276

29358

0

शहापुर

222

71989

35039

36950

399

 एकुण

792

258447

142388

116059

947

 

जल जीवन मिशन अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत.

  1. अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये 55 ली. दरडोई दर दिवशी प्रमाणे पाणी उपलब्ध असलेल्या गावांमध्ये 100 टक्के नळ जोडणी करणे
  2. अस्तित्वातील योजनांमध्ये 55 ली. दरडोई दर दिवशी प्रमाणे पाणी उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजनांसह 100 टक्के नळ जोडणी करणे
  3. नळ पाणी पुरवठा नसलेल्या गावांमध्ये नवीन नळ पाणी पुरवठा योजना करुन 100 टक्के नळ जोडणी करणे.
  4. सौर उर्जेवर लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे
  5. जल जीवन मिशन कार्यक्रम 50 : 50  केंद्र व राज्य निधी अंतर्गत राबविण्यात येणार आहे. तसेच नळ जोडणीसाठी १५ वा वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध निधी वापरण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत.

आमदार निधी

            आमदारांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मा.आमदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

 खासदार निधी       

       मा.खासदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

  डोंगरी विकास कार्यक्रम

            मा.आमदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

  ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना

            या योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी गाव/पाड्यांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शिफारस करण्यात आलेल्या कामांना ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात येते व प्रकल्प कार्यालयामार्फत सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येते.

यांत्रिकी उपविभाग

यांत्रिकी विभागाच्या कार्यकक्षेमध्ये खालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

व्यवस्थापकीय कार्य

  • टंचाई तसेच आदिवासी उपयोजना, आमदार व खासदार निधी अंतर्गत नवीन विंधन विहिर घेणे व हातपंप बसविणे.
  • अस्तित्वातील विंधन विहिरींची ग्रामपंचायतीबरोबर करार करुन देखभाल व दुरुस्ती करणे.
  • विद्युत पंप व सौर पंपावर आधारीत लघु न.पा.पु.योजना करणे.
  • हातपंपाची मागणी व वसुलीची माहिती अद्ययावत करणे व प्रत्यक्षात वसूली करणे.
  • तांत्रिक कार्य

    1. देखभाल दुरुस्ती पथकाचे माध्यमातून करार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे अंतर्गत असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती करणे.
    2. विंधन विहिरींचे फ्लशिंग करणे.
    3. ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सर्वेक्षण करुन, छोट्या वाड्यांसाठी विंधन विहिरींवरुन विद्युत पंप व सौर पंपाच्या माध्यमातून लघु न.पा.पु.योजना करणे
    4. नवीन विंधन विहिर घेणे

     देखभाल दुरुस्ती कक्ष

    4 मार्च 2011 चे शासन निर्णयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत देखभाल दुरुस्ती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  देखभाल दुरुस्ती कक्षाच्या कार्यकक्षेमध्येखालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

    व्यवस्थापकीय कार्य

    1. संपूर्ण जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची माहिती अद्ययावत ठेवणे
    2. ग्रामपंचायतीनिहाय पाणीपट्टी व देखभाल दुरुस्ती खर्चाचा आढावा घेणे
    3. विजेचा वापर कमी ठेवणेबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे
    4. घरगुती नळपाणी पुरवठा करीता कनेक्शन वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व लाभार्थ्यांना नियमित आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याकडे लक्ष देणे.
    5. लाभार्थ्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करणे.
    6. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती करणे.
    7. पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, पुरक योजना करणे.

    तांत्रिक कार्य

    1. संबंधित ग्राम पंचायतींना पाणी पुरवठा योजनांच्या व आपत्कालिन परिस्थितीमध्ये तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षित करणे.
    2. पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत यास्तव प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत सूचना करणे.
    3. लाभार्थ्यांनी पाणी योजनांचा लाभ घेतला नाही तरी देखभाल दुरुस्ती कक्षाने सदर योजना सुरु राहिल याकडे लक्ष देणे
    4. योजनांच्या उभारणीत आवश्यक मानकानुसार निश्चित केलेया गुणवत्तेचेच साहित्य वापरात आणले जाईल याकडे लक्ष देणे.

    आर्थिक कार्य

    1. ग्रामपंचायत निहाय वार्षिक खर्चाची आकडेवारी इ. माहिती तयार करणे
    2. प्रोत्साहन अनुदानासाठीचे प्रस्ताव वेळच्यावेळी शासनास पाठविले जातील याकडे लक्ष देणे
    3. योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखभाल दुरुस्ती निधीमधून करणे.