ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत विविध समित्या:


स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती व इतर विषय समित्या यांची नेमणूक, रचना व कार्ये:-

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची नेमणूक) नियम 1963 नुसार स्थायी व विषय समिती यांची नेमणूक करण्यांत येईल.

  • स्थायी समिती.
  • समाजकल्याण समिती.
  • शिक्षण समिती
  • बांधकाम समिती
  • महिला व बालकल्याण समिती
  • कृषि समिती
  • वित्त समिती.
  • आरोग्य समिती.
  • पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती.
  • जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती.

 

1.स्थायी समितीची रचना :-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (1) कलम 81 च्या तरतुदींचे अधीनतेने जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेने आपल्या  सदस्यांमधून निवडून दिलेले आठ  सदस्य यांची मिळून स्थायी समिती सभेची रचना असते. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती असतात. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिध्द् सदस्यसचिव असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व  सर्व खातेप्रमुख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

2. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना:-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (अ) (1) कलम 81 च्या तरतुदींना अधीन राहून जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना करण्यात येते. सदर समितीचे पदसिध्द् सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तर सदस्य सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतात. सर्व विषयसमितीची सभापती या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत व जिल्हा परिषद सदस्यांमधून चार  सदस्य या समितीवर निवडून दिले जातात (SEE AMMENDMENT) या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लपा व ग्रामीण पाणीपुरवठा याचे पदसिध्द सदस्य असतात.

 

3. इतर विषय समित्यांची रचना:-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 80, 81,82 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा (समित्यांची निवडणूक) नियम 1967 अन्वये विषय समित्यांची रचना केलेली आहेत.

 

4. स्थायी समितीचे व विषय समित्यांचे अधिकार व कार्ये:-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 109 व कलम 109 (अ) अन्वये स्थायी समिती व विषय समित्यांची अधिकार व कार्ये नमूद केलेले आहेत. त्यानुसार समित्यांची कार्ये चालते.

 

5. स्थायी समितीचे व विषय समित्यांचे सभांचे कामकाज:-

                        महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 119 अन्वये स्थायी समिती व विषय समित्यांची कामकाज चालते.

5.3 स्थायी समिती, विषय समिती स्वरुप  तयारी :-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 नुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेचे निवडून दिलेले आठ सदस्य यांची मिळून स्थायी समिती सभेची रचना असते. जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव असतात. या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व  सर्व खातेप्रमुख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

स्थायी समिती सभेची तयारी :-

  1. स्थायी समिती सभा दरमहा आयोजित केली जाते.
  2. स्थायी समिती सभेमध्ये आर्थिक रित्या 30.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंतच्या कामांकरीता मंजुरीसाठी विषय सादर केले जातात.
  3. स्थायी समिती सर्वात महत्वाची समिती आहे.
  4. स्थायी समितीची पुर्ण मुदतीची विहीत नमुनयातील नोटीस सभेच्या 7 दिवस आधी सभासंदापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. सदरची नोटीस जिल्हा परिषदेच्या नोटीसबोर्डावरही लावावी.
  5. स्थायी समितीच्या पुर्वतयारी देखील जिल्हा परिषद सभेप्रमाणेच करण्यात येते.

 

विषय समिती :-

            महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 79 (अ) नुसार विषय समितीची रचना असते. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची रचना करण्यात येते. सदर समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असतात तर सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे असतात. सर्व विषयसमितीची सभापती या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत व जिल्हा परिषद सदस्यांमधून सहा  परिषद सदस्य या समितीवर निवडून दिले जातात (SEE AMMENDMENT) या व्यतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता, लपा व ग्रामीण पाणीपुरवठा याचे पदसिध्द सदस्य असतात.