ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

.क्र.

योजनेचे नांव

योजनेचा उद्देश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नांव व दूरध्वनी क्रमांक

1

2

3

4

5

1

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

अनु.जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप बँकेमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते इयत्ता 5 वी ते 7 वी वार्षिक शिष्यवृत्ती 60X10= रू.600/-, इयत्ता 8वी ते 10वी वार्षिक शिष्यवृत्ती 100X 10=रू.1000/-

विद्यार्थीनी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.    5 वी ते 7 वी किंवा 8 वी ते 10वी मध्ये शिक्षण घेणारी असली पाहीजे.

 

2

आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुदान योजना

समाजातील जातीय भेदभाव, जाती-जातीतील आंतरकलह, भेदाभेद, अस्पृश्यता निवारण होण्यांचे दृष्टीने व सामाजिक ऐक्य वाढवणे साठी ही योजना राबविली जाते.

विवाहीत जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा व दुसरा व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शिख धर्मीय असावा. (मुस्लीम व ख्रिश्चन धर्म सोडून ). तसेच उपरोक्त मागासवर्गीयापैकी आंतरजातीय विवाह झाला असेल तरी सुध्दा या योजनेचा लाभ घेता येतो जसे विजाभज, अनु.जाती, अनु.जमाती , वि.मा.प्र. यांचेत आंतरप्रवर्ग विवाह झाला असेल तर

 

3

एम एस सी आय टी संगणक प्रशिक्षण फी परतावा (20 टक्के सेसफंड अनुदान योजना )

मुला/मुलींना नोकरी करीता/ स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी फीचा परतावा.(100टक्के अनुदान)

1) दारिद्र रेषेखाली असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अथवा  रु 100000/- पर्यन्त तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. 2) अर्जदाराची शैक्षणीक पात्रता किमान 10 वी उर्त्तीण 3) एम एस सी आय टी परिक्षा उर्त्तीण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

 

4

वृध्द साहित्यीक व वृध्द कलावंतांना मानधन देणे

समाजातील अनिष्ट चाली-रिती, व अनिष्ठ प्रथा, निर्मुलनाच्या दृष्टीने लोककलेव्दारे जनजागृतीकरुन समाज प्रबोधन करणा-या कलावंतांना वृध्दाअवस्थेत  शासनाचे वतिने मासिक मानधन देणे

1)  मागिल 13-15 वर्षापासुन सातत्याने साहित्य व कला क्षेत्रात मोलाची भर घालणारी कलावंत व्यक्ती. 2. सांस्कृतीक कला आणि वाडःमय क्षेत्रात ज्यांनी प्रदीर्घ महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे अशी व्यक्ती. 3. वृध्द कलाकाराचे वय 50 वर्षा पेक्षा जास्त असावे. 4. जे कलाकार व साहित्यीक अपंग आहेत, अशा व्यक्तिंना वयाची अट नाही. जसे अर्धांगवायु, क्षय, कर्क रोग, कुष्ठरोग किंवा शारिरीक व्यंग असल्याने ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नाही, अशा व्यक्ति. कलावंत शासकिय सेवेतील वा सेवानिवृत्तधारक नसावा. तसेच कलावंत शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभार्थी अथवा अनुदान घेत असलेला  नसावा.

 

5