ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती
  1. कार्यपध्दती –

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ठाणे जिल्हातील पाच तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, खाजगी अनुदानी या  शाळांना मोफत पाठयपुस्तक योजने अंतर्गत मोफत पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात येत आहे.

 तसेच ठाणेतील जिल्हा परिषदेच्या शाळांना इ. १ ली ते  ८ वी मधील शासकिय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळाकडून शिक्षण घेत असलेल्या सर्व अनुसूचित जाती/जमातीचे मुले तसेच दारिद्र रेषेखालील सर्व संवर्गातील पालकांच्या  मुलांना गणवेश योजने अंतर्गत  गणवेशाचे  वाट करण्यात येते.    

  तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती चे देखभाल दुरुसती, शाळा अनुदान व इतर खर्चसाठी सयुंक्त अनुदान देण्यात येते.

तसेच समावेशित शिक्षण अंतर्गत ठाणे जिल्हयातील तालुका निहाय्य विशेष गरजा विदथार्थी ब्रेल बुक  , लार्ज प्रिंट,  मदतनीस भत्ता, प्रवास भत्ता, पालक प्रशिक्षण,  थेरपी , अलिम्को, विद्यावेतन अशा विविध सुविधा देण्यात येतात.