ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा:

 

 

सर्व शिक्षा अभियान – जिल्हा परिषद ठाणे

शाळा प्रवेशोत्सव अहवाल

सन 2018-19

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 या महत्वपूर्ण कायदयाची अंमलबजावणी दि.01.04.2010 पासून राज्यात सुरु झाली. 6 ते 14 वर्षे वयोगटातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.त्यासाठी शासन वेगवेगळे उपक्रम राबवून बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

 १) पूर्वतयारी –

   शिक्षणाचा हक्क व पटनोंदणी कार्यक्रम 2018 साठी जिल्हास्तरावर दिनांक 02.06.2018, 05.06.2018 वद 11.06.2018  रोजी सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, व सर्व शिक्षा अभियान कर्मचारी या क्षेत्रीय अधिका-यांची पटनोंदणी जनप्रबोधन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यानुसार सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी गटशिक्षणाधिाकरी यांच्या मार्फत  प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांची जनप्रबोधन कार्यक्रमासंबंधी प्रेरणा कार्यशाळा केंद्र स्तरावर घेण्यात आल्या. दाखलपात्र मुलांची याद्या, गाव आराखडयानुसार मुलांची पटनोंदणी ,शाळेने केलेली वातावरण निर्मिती, प्रवेशोत्सव संदर्भात मुलांची प्रवेश दिंडी, वाजगत गाजत मिरवणूक, नवागतांचे स्वागताचा कार्यक्रम, शाळेची व आवाराची स्वच्छता, शालेय स्वच्छता व पाणी ठेवण्याची जागा, हॅन्डवॉश स्टेशन स्वच्छ ठेवणे पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, लेखन साहित्याचे वाटप,शालेय स्तरावर मुले कशी आनंदी राहतील याबाबत माहिती, वृक्षारोपण, विविध कार्यक्रमाचे नियोजन, सभाचे इतिवृत्त, दिव्यांग विदयार्थ्यानी शाळेत प्रवेश घ्यावा, वृक्ष लागवडी संदर्भात विदयार्थी निहाय झाडाचे नियोजन इत्यादी विषंयाची सखोल माहिती देण्यात आली.

       2.  शाळा व्यवस्थापन समिती बैठका  – (दि.14.06.2018)

      ठाणे जिल्हयात सर्व  गटातील सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर सभेमध्ये महिला बचत गट,माता पालक संघही सहभागी झाले होते.  शाळा सतरावर जे उपक्रम राबवायचे आहेत त्यांची माहिती सभेपूढे मांडण्यात आली. शाळा स्तरावरील सर्व समस्या व योजनांची माहिती देण्यात आली. तसेच प्रवेशपात्र विदयार्थ्याची नावे वाचून दाखविण्यात आली तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या यादया प्रथम दर्शनी लावण्यात आाल्या. तसेच पटनोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. पालकांना प्रेरित करण्यासाठी दाखलपात्र मुलांच्या पालकांना गृहभेटी देण्यात आल्या. पालकांशी चर्चा करुन मुलांना पाहिल्या दिवसापासूनच शाळेत पाठविण्याचे आहवान केले. या सर्व सभाचे इतिवृत्त शाळास्तरावर ठेवण्यात आले.

  1.      शाळा प्रारंभ दिन/प्रवेशदिंडी  – (15.06.2018)

              ठाणे जिल्हयातील पाचही गटात दि 15.06.2018 रोजी शाळेचा पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी (प्राथ), सर्व माध्यमिक व प्राथमिक विस्तार अधिकारी (शिक्षण) तसेच जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तालूक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व सर्व समग्र शिक्षा अभियानाचे सर्व अधिकारी व  कर्मचारी, केंद्रप्रमुख, तसेच  शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक सकाळी 7.00 वाजता शाळेत उपस्थित राहून सर्व विदयार्थी, शिक्षक, गावातील युवक, मा.सरंपच,गावातील ज्येष्ठ नागरिक,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक संघ सदस्य लोकप्रतिनिधी यांच्या समवेत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीत शिक्षणाचे महत्व पटवून देण्याच्या घोषणा देण्यात आल्या तसेच विदयार्थ्यानी देशभक्तीपर गीत गावून उत्साहित  वातावरणात नवगतांचे स्वागत झाले.

 नवागतांचे स्वागत – (15.06.2018)

शाळा प्रवेश उत्सवामध्ये नवागताचे स्वागत सजविलेल्या बैलगाडीतून, तसेच विविध वाहनातून मिरवणूक काढून त्यांना आनंदी ठेवण्यात आले. सर्व तालूक्यातील सर्व शाळांमधील शालेय व्यवस्थापन मितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत इ.1लीत प्रवेश घेतलेल्या बालकांचा फुले,चॉकलेट व खावू देवून स्वागत करण्यात आले व त्यांच्या मनातील शाळेविषयीची भिती दूर करण्यात आली.

5. पाठयपुस्तक वाटप – (15.06.2018)

          मा. शिक्षणाधिकारी (प्राथ) व जिल्हा स्तरावरील विस्तार अधिकारी यांच्या  हस्ते नवगंताचे स्वागत झाले व पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच  शाळा प्रवेशत्सोवाच्या दिवशी दिव्यांब विदयार्थ्यांनाही शाळा प्रवेश देण्यात येऊन दिव्यांग विदयार्थ्यांचे हस्ते वृक्षारोपन करण्योत आले. शाळामंध्ये उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते 1 ली ते 8 वी च्या सर्व बालकांना शैक्षणिक साहित्य मोफत पाठयपुस्तकाचे वाटप करण्यात आले.

 

6. मध्यान्ह भोजन  –

आनंदीत शाळेत हजर झालेल्या मुलांना प्रार्थना हॉलमध्ये एकत्र बसवून नवागतांचे पुष्पगुच्छ पुस्तके, विविध शैक्षणिक साहित्य, वहया, चॉकलेट देवून स्वागत करण्यात आले. त्याचे बोबडे बोलांच्या माध्यमातून त्याचा परिचय घेण्यात आला. त्याच्याकडून बोल,गाणी म्हणून घेतली. विदयार्थ्याना त्या दिवशी शालेय पोषण आहारा सोबत मध्यान्न भोजनात शिरा,लाडू, जिलेबी,बुंदी,खीर आदी प्रकारचे मिठान्न देवून विदयार्थ्याचा आनंद व्दिगुणीत केला.

     आनंदीत शाळेत हजर झालेल्या मुलांना प्रार्थना हॉलमध्ये एकत्र बसवून नवागतांचे पुष्पगुच्छ पुस्तके, विविध शैक्षणिक साहित्य, वहया, चॉकलेट देवून स्वागत करण्यात आले. त्याचे बोबडे बोलांच्या माध्यमातून त्याचा परिचय घेण्यात आला. त्याच्याकडून बोल,गाणी म्हणून घेतली. विदयार्थ्याना त्या दिवशी शालेय पोषण आहारा सोबत मध्यान्न भोजनात शिरा,लाडू, जिलेबी,बुंदी,खीर आदी प्रकारचे मिठान्न देवून विदयार्थ्याचा आनंद व्दिगुणीत केला.

   अशा प्रकारे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व मुले ही शाळेच्या प्रवाहात आली पाहिजेत. तसेच नव्याने दाखल होणारी दाखलपात्र मुले ही सुध्दा 100% दाखल होवून 100% पटनोंदणी व्हावी यासाठी पहिल्या आठ दिवसामध्ये प्रत्येक दाखल पात्र विदयार्थ्याच्या घरी जावून प्रवेशपत्र भरुन घेणे हा कार्यक्रम  ठाणे जिल्हयात यशस्वी करुन 100% पटनोंदणी उददिष्टे साध्य केले. सर्वेक्षणानुसार एकूण 3 शाळाबाहय विद्यार्थ्यांना वयानुरुप प्रवेश देण्यात आला व सर्वेक्षणाबाहेरील ६ ते १४ वयोगटातील शाळाबाहय मुलांचा शोध घेण्यासाठी दि. २९ जून २०१८ रोजी ठाणे जिल्हयात विशेष शोध मोहिम राबवून २३४ विद्यार्थी शोधून त्याच  दिवशी नजीकच्या शाळेत प्रवेश देऊन सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. राज्यामध्ये सर्व प्रथम असा उपक्रम राबविणारा ठाणे हा  पहिला एकमेव जिल्हा ठरला आहे. ठाणे जिल्हयात सर्व तालुक्यातील एकूण 13328  विदयार्थी शाळेत दाखल झाले आहेत.

                                                   शिक्षणाधिकारी (प्राथ)

                                                      जिल्हा परिषद ठाणे