ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय:

  • l.विभागाचे ध्येय

     

    • ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवुन आणणे.
    • ग्रामीण स्वच्छतेचा व्याप्तीची गती वाढवुन सन 2020 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतीना हागणदारी मुक्त ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवुन देऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण करणे
    • शाश्वत स्वच्छतेचा साधनांचा प्रसार करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जाग्रुती व आरोग्य शिक्षण याद्वारे प्रेरीत करणे.
    • शौचालयचा वापर व देखभाल संबंधी आवश्यक माहिती पुरवणे कुटुंबांना शौचालय वापरास प्रवृत्त करणे.
    • सर्व शिक्षा अभियान अंतर्गत (SSA) येत नसलेल्या शाळा व अंगण्वाडयांना सुयोग्य स्वच्छता सोयी पुरविणे आणि विद्यार्थाना आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सवयी याबद्दल महिती देणे.
    • पर्यावरणाच्या दष्टीने सुरक्षित, कायम स्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
    • ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाऱ्या पर्यावरणानुकुल स्वच्छतेच्या पध्दती विकसीत करणे.
    • पिण्याच्या पाण्याची योग्य साठवण, वापर व हाताळणी या शुद्धतेच्या बाबींविषयी  जागरुकता  वाढविणे.
  • l.अंमलबजावणीचे धोरण...

    • गावस्तरावर स्वच्छता उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविणे.
    • हागणदारीमुक्तीसाठी लोकचळवळ बळकट करणे.
    • हागणदारीमुक्त घोषित केलेल्या जिल्हयामध्ये निरंतर स्वच्छतेसाठी आंतरव्यक्ति संवादासह नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे.
    • ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, MGNREGA, MSRLM व इतर सर्व शासकिय विभागांच्या समन्वयातुन स्वच्छतेसाठी अनुकूल वातावरण    निर्मिती करणे.
    • लोकप्रतिाधिनी, विविध शासकिय विभाग, स्वयंसेवी  क्षेत्र, खाजगी उदयोजकांच्या सामाजिक उत्तरदायित्वला सक्रिय करणे, सदर घटकांना स्वच्छता संवाद उपक्रमांशी जोडून सक्रिय सहभाग मिळवणे.

    l.अभियनातंर्गत उपक्रम...

    • जिल्हास्तर...
    • दिनांक 5 ते 8 ऑगस्ट 2017 दरम्यान अभियानपुर्व जिल्हास्तरावर मेळाव्याचे आयोजन - या मेळाव्यात जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांचा सहभाग निश्चित करावा.जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद/पंचायत समिती अधिकारी, सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक, आदींचा यांचा समावेश या मेळाव्यात करावा. याच मेळाव्यात तंत्रज्ञानाविषयक प्रदर्शनाचे आयोजन करावे.

     

    • दिनांक 08/08/2017 पुर्वी डीजीटल आयईसी एलईडी व्हॅन (Led Van), कलापथक व साहित्य निर्मिती/निवड अंतिम करणे तसेच या उपक्रमांचा सविस्तर तारीखनिहाय गावस्तरावरील कार्य्क्रम निश्चित करणे.

     

    • आंतरव्यक्ति संवाद साहित्य -  संवादकासाठी कीट व लाभार्थीसाठीचे कीट तयार करणे. यामध्ये घडीपत्रिका, माहितीपुस्तिका, पॉकेट डायरी व आवश्यक इतर साहित्यांचा त्यामध्ये समावेश करावा.

     

    • तालुकास्तर...
    • दिनांक 9 ते 11 ऑगस्ट 17 या कालावधी दरम्यान तालुकास्तरावर भव्य स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करावे. यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. या पाहूण्यांच्या हस्ते हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी/कर्मचारी, संपर्क अधिकारी, साधन व्यक्ति आदींचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करावा.
    • तालुकास्तरावर गाव ते तालुकास्तरावरील पदाधिकारी, अधिकारी या अभियानातील सर्व स्तरावरील अपेक्षित संवादक यांना निमंत्रित करुन या कार्यशाळेत निर्माण केलेल्या संवाद साहित्याबाबत व त्याचा वापराबाबत मार्गदर्शन करणे.

     

    • या अभियानामध्ये गावस्तरावर गृहभेटीसाठी संवादकांची निवड (50 कुटंुबामागे 1 संवादक टीम व एका टीममध्ये किमान 3 सदस्य) याप्रमाणे करुन गावातील गृहभेट उपक्रम सुरु करण्यापुर्वी स्थानिक संवादकांचे प्रभावी आंतरव्यक्ति संवादाबद्दल उद्बोधन करण्यात यावे.

     

    • गावस्तर...
    • गावस्तरावरच्या वातावरण निर्मितीसाठी अभियानाच्या पहिल्या टप्यामध्येच ग्रामसभा, कलापथकांचे कार्यक्रम, डिजीटल व्हॅनद्वारे फिल्मो शो, जाणीव जागृती करणे
    • शालेय विदयार्थ्यांच्या मदतीने वेळोवेळी स्वच्छता फेरीचे आयोजन करणे
    • दिन विशेष- अभियान कालावधीमध्ये महत्वाचे दिन विशेष येत आहेत. या सर्व दिवसांचा योग्यप्रकारे संदेश प्रसारणासाठी उपयोग व्हावा यासाइी प्रयत्न करावा.
    • स्थानिक विशेष दिन/ कार्यक्रमांचा समावेशही करावा.
    • गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी व पाण्याचा स्त्रोताचा परिसर स्वच्छ करणे
    • शालेय स्वच्छतादुत, पाणी व स्वच्छतेविषयी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदि उपक्रम राबविणे

     

    • अपेक्षित परिणाम...

    कुटुंबस्तरावर स्वच्छतेसंबंधी आणि स्वच्छतेच्या सवयीसंबंधी अपेक्षित बदलासाठी दृष्टीकोन विकसीत होईल.