ठाणे जिल्हा परिषद

           


विभागाची कार्यपध्दती:

ग्रामपंचायत विभागात सर्वसाधारण 16 शाखा असून ग्रामपंचायत विभागाअंतर्गत  विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या सवंर्गातील कर्मचा-यांची भरती, बाढती बदल्या, अनुकंपा पध्दतीने नोकरी देणे, भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम मंजूर करणे, वैद्यकीय बिल मंजूर करणे, विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा फिरती कार्यक्रम व मासिक दैनंदिनी मंजूर करणे, जिल्हा परिषद व शासन स्तरावरील सभेची माहिती संकलित करणे, माहिती अधिकारान्वये माहिती उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी  व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करणे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील  सरपंच/सदस्यांचे,अधिकारी व कर्मचारी  प्रशिक्षण आयोजन करणे. जिल्हा ग्राम विकास विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतीना कर्ज मंजुर करणे. कै आर आर (आबा) पाटील सुदंर गाव योजनांची अंमलबजावणी करणे. 15 वा वित्त आयोगाचे अनुदान ग्रामपंचायतींना वितरीत करणे. शासन स्तरावर प्राप्त मुद्रांक शुल्क अनुदान ग्रामपंचायतीना वाटपकरणे. पेसा कायदा 1996 अंमलबजावणी व प्रशिक्षण आयोजित करणे. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पेसा गावांना गौण वनोपज करीता एकवेळेचे अर्थसहाय्य देणे. ५ टक्के अबंध निधी पेसा गावांना वितरीत करणेबाबत संनिंत्रण व अहवाल सादर करणे.ग्रामपंचायतींचा विकास करणेकरिता जनसुविधा,नागरी सुविधा,तिर्थक्षेत्र विकास,ग्रामीण कोकण पर्यटनया योजना राबविणे. आमच गांव आमचा विकास योजनेंतर्गत विविध उपक्रम चालविणे.प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण व सर्वांगिण विकास करणे.जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पाठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे.पंचायत राज समिती,महालेखाकार,स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे.