ठाणे जिल्हा परिषद

           


यशोगाथा:

73 व्या घटनादरुस्तीने पंचायतराज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करुन दिला म्हणजे केद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रमाणेच पंचायत राजलाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. यामुळे सर्व राज्यात जिल्हा तालुका व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायतराज पध्दती सुरु झाली .

ठाणे जिल्हयात 431 ग्रामपंचायती असून त्यामुध्ये प्रामुख्याने विकास कामांचे आराखडे, विविध योजनांच्या लाभार्थीची निवड व इतर अनुषंगीक कामे पार पाडली जातात.

तसेच विविध योजनामध्ये  15 वा वित्त आयोग, कोकण पर्यटन विकास, पेसा गाव राबविण्यांत येवून ग्रामपंचायती बळकटीकरण होण्यासाठी उत्पन्नाचा भाग म्हणून जमिन महसूल, जमीन समानीकरण, मुद्रांक शुल्क, यात्राकर, जकात कर, मागासवर्गीय अनुदान, गौण खनिज इत्यादीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.