ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती:


अक्र

योजनेचे नाव

योजनेचा उददेश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव व दूरध्वनी क्रमांक

1

जिल्हा व तालुका पातळीवर क्रिडा व विविध गुणदर्शनाच्या स्पर्धा आयोजित करणे व विदयार्थ्याच्या प्रवासखर्चाची तरतूद

जि.प च्या प्राथमिक शाळांमधील विदयार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच यासाठी वक्तृत्व स्पर्धा, समूहगान स्पर्धा, नाटयस्पर्धा व प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात येऊन त्यांना नविन वस्तूंची निर्मित करण्यात येऊन प्रोत्साहित करणे हा योजनेचा उददेश आहे.

 

लहान गट इ. 1ली ते 4 थी

मोठा गट इ. 5 वी ते 7 वी

सदरची योजना प्रथम तालुकास्तरावर व त्यांनतर

विभागीय स्तरावर राबविली जाते.

 

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

2.

विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे

जि.प च्या प्राथमिक शाळांतील विदयार्थ्यांना विज्ञानामधील प्रयोगाची माहिती होणेसाठी व त्यांना नवीन वस्तूंची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन करणे.

इयत्ता 1 ली ते 7 वी चे विदयार्थी आणि इ. 8 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विदयार्थी.

(तालुकास्तरीय व जिल्हास्तर)

विदयार्थ्यांनी विज्ञान विषयावर आधारीत तयार केलेली सुमारे आठ उपकरणे व प्रकल्पाची जिल्हा प्रदर्शन भरवून निवड करण्यात येते.

 

 कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

3

शिक्षक दिन साजरा करणे.

सदर योजना ग्राम विकास व जलसंधारण विभागाकडील परिपत्रक क्रं. संकिर्ण-1000/प्र.क्र.3241/15 दिनांक 12/12/2000 नुसार राबविण्यात येत असून जिल्हयातील उत्कृष्ट शैक्षणिक सामाजिक कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. सदरचा कार्यक्रम शिक्षकदिनी म्हणजेच दि. 5 सप्टेंबर रोजी घेण्यात येतो.

सदर परिपत्रकानुसार प्रत्येक तालूक्यातून पाच प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात येते तसेच तालूकास्तरावर प्रत्येक बीटमधून एक याप्रमाणे जि.प शाळांमधील प्राथमिक शिक्षकाची निवड करण्यात येते. कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचेकडील क्र.2003/प्र.क्र./421/ आस्था9/दि.22/12/2003 नुसार माध्यमिक शिक्षकांची निवड न करण्याबाबतच्या सुचना  दिलेल्या असल्यामुळे माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात येत नाही.

 

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

4

कब बुलबुल योजनेची अंमलबजावणी करणेसाठी अनुदान

शील सवंर्धन, शारीरीक आरोग्य, व्यवसाय व इतरांविषयी कर्तव्याची जाणीव, सेवाभाव व श्रमाची जाणीव इ.

जिल्हा परिषदेतील 1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्यांना सहभागी होता येते.

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

5

जि.प प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांसाठी कृतीआधारीत अध्ययन सुरु करणे.

जि.प च्या शाळेत शिकणा-या विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे. कृती आधारीत अध्ययन पध्दती राबविल्याने विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढेल. उपस्थिती वाढेल, प्रत्येक विदयार्थ्याला स्वत:च्या पध्दतीने अध्ययन करता येईल.जि.प शाळांची पटसंख्या वाढून गळतीचे प्रमाण कमी होईल.

जि.प च्या इ. 1 ली ते 4 थी च्या एकूण विदयार्थी 58235 शिक्षण घेत आहेत.

 

कार्यासन-नियो-1,

दुरध्वनी क्र. 02225362445


अक्र

योजनेचे नाव

योजनेचा उददेश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव व दूरध्वनी क्रमांक

6

जि.प प्राथ व उच्च प्राथ शाळेतील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा फी भरणे तसेच शिष्यवृत्तीची पुस्तके व प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करुन देणे व ग्रामीण भागातील शिष्यवृत्ती मिळणा-या विदयार्थ्यांखेरील गुणानुक्रमे येणारे विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती

जि.प च्या शाळेत शिकणा-या विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे. जि.प शाळेतील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करणे व त्यांना प्रोत्साहित करणे.

जि.प च्या इ. 5 वी ते 8 वी शिक्षण घेणा-या  प्राथ व माध्यमिक हुशार व प्रतिभावान विदयार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या हेतुने हि परीक्षा घेण्यात येते.

कार्यासन:- प्रास-5,

दुरध्वनी क्र. 02225362445

7

 

नवीन जिल्हा परिषद नर्सरी स्कूल चालविण्यासाठी मानधन (इंग्रजी माध्यम सुरु करणे.)

जि.प च्या 1376 शाळा असून मराठी,हिंदी,गुजराती,ऊर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. सदरहू शाळांमधून ग्रामीण,आदिवासी दूर्गम भागातील विदयार्थी शिक्षण घेतात. सध्या सर्वसामान्य पालकांचा कल इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे आहे. विदयार्थ्यांना इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी व शाळेची गोडी लागावी म्हणून प्रत्येक तालूक्यात इंग्रजी माध्यमाच्यार नर्सरी ज्यू.के.जी, सिनिअर के.जी सुरु करुन त्या ठिकाणी मदतनीस शिक्षिका नेमल्या जातात. सदर शिक्षिकांना मानधन देण्यात येते.

 

मराठी,हिंदी,गुजराती,ऊर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा.

 

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

 

8

 

 

माझी शाळा प्रगत शाळा

 

 

 

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे. विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी शाळेला कला साहित्य, क्रीडा साहित्य, ग्रंथालयातील पुस्तके योजनेनुसार उपलब्ध करुन घेण्यासाठी निधी देणे. लोकसहभागातून ई-लर्निंग करण्यात आलेल्या शाळांसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करुन देणे.

 

 

 

 

 

 

शाळेच्या विकास आराखडयासाठी निधी उपलब्ध करुन देणे. तसेच 100% मुले प्रगत होण्यासाठी आवश्यक त्या शैक्षणिक पुरक साहित्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे.

 

 

कार्यासन:- नियो7

दुरध्वनी क्र. 02225362445

अक्र

योजनेचे नाव

योजनेचा उददेश

(दोन ओळीत)

लाभार्थी/ पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव व दूरध्वनी क्रमांक

 

9

 

इ. 10 वी/12 वी मध्ये विशेष गुणवत्ताधारक विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर पुढील शिक्षणासाठी संगणक/टॅब/नोटबुक/लॅपटॉप इ. उपलब्धक करुन देणे किंवा त्यासाठी अर्थसहाय्य करणे.

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2016 च्या परीक्षेत किमान 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या सर्व प्रवर्गाच्या मुला-मुलींना लॅपटॉप उपलब्ध करुन देणे.

 

इयत्ता 10 वी 12 तील गुणवंत विदयार्थी

1.विदयार्थी हा शासनमान्यताप्राप्त शाळा तसेच ग्रामीण भागातील रहिवासी असावा.

2.विदयार्थी हा नियमित विदयार्थी असुन तो प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण आलेला असावा.

3.विदयार्थ्यास किमान 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक राहिल.

 

कार्यासन-नियो-1,

दुरध्वनी क्र. 02225362445

 

 

 

 

 


अक्र

योजनेचे नाव

योजनेचा उददेश

(दोन ओळीत)

 

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव व दूरध्वनी क्रमांक

 

1

 

समाजातील दुर्बल घटकांतील मुलींना उपस्थिती भत्ता देण्यासाठी जि.प ना अनुदान

(लेखाशिर्ष 22024526)

 

प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसास 1/- रु. या दराने वर्षाचा एकुण रु. 220/- उपस्थिती भत्ता अनुज्ञेय राहिल. हा उपस्थिती भत्ता मुलींच्या माध्यमातून पालकांना मिळणार असल्यामुळे पालक हे मुलींना शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दिवस शाळेत उपस्थित राहण्याबाबत दक्षता घेतील.

 

इ. 1 ली त 4 थीतील विदयार्थीनी/

शैक्षणिक वर्षातील जितके दिवस विदयार्थीनी उपस्थित राहतील. त्याप्रमाणे त्यांना उपस्थित भत्ता लागु होईल.

 

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

2

 

प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला अनूदान

(लेखाशिर्ष 2202H534)

जि.प.शाळा दुरुस्तीसाठी सर्वसाधारणपणे जिल्हा वार्षिक योजनेतर्गत जिल्हा निधीतून दरवर्षी प्राथमिक शाळांच्या विशेष दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेस अनुदान या योजनेतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. सदरचा निधी विनियोग हा शाळांच्या लहान-मोठया दुरुस्तीवंर होत असतो. काही वर्षापासुन हा निधी मोठया दुरुस्तीकरीता केला जात असुन सदरचा निधी हा शाळांच्या किरकोळ दुरुस्तीवर खर्च केला गेल्यास इमारतींचे आयुष्य वाढेल.

 

1.सदर योजनेअंतर्गत शाळा दुरुस्ती व देखभालकरीता शालेय व्यवस्थापन समितीस रक्कम वर्ग करणे.

2.जि.प शाळा किरकोळ दुरुस्ती.

 

कार्यासन:- प्रास-5,

दुरध्वनी क्र. 02225362445

3

शाळेत मुलींच्या नावनोंदणीकरीता प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी जि.प ना अनुदान

(लेखाशिर्ष 22024713)

मुलींचे शिक्षणाचे बाबतीत 1983-84 या वर्षात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील एकशिक्षकी प्राथ. शाळा व बहुशिक्षकी प्राथ. शाळांमधील काम करणा-या इ. 1 व 2 मधील प्राथ शिक्षकांनी उत्कृष्टपणे कामगिरी केली असेल अशा प्राथ. शिक्षकांना प्रोत्साहन पारितोषिके मंजुर करणे.

मुलींच्या पटनोंदणीसाठी ज्यांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. असे प्राथमिक शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या या योजनेखाली प्रामुख्याने विचार करुन अंतिम निवड होईल त्यांना प्रत्येकी रोख रु. 100/- चे पारितोषिक व प्रशस्तीपत्रक दिले जाते.

कार्यासन-नियो5

दुरध्वनी क्र. 02225362445

 

4

 

पुर्वीच्या शासकीय माध्यमिक शाळांच्या इमारती/विशेष दुरुस्ती यासाठी जि.प ना अनूदान

(लेखाशिर्ष 22024633)

 

सदर लेखाशिर्षाअंतर्गत ठाणे जिल्हयातील टेंभी नाका येथील 150 वर्षाची पंरपरा असलेल्या इमारतीचे बांधकाम या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आले आहे. तसेच जि.प शासकीय माध्यमिक कन्याशाळा ठाणे या एकूण 3  ईमारती असून सदर ईमारती 1932 पासून आहेत त्यामधील ईमारत क्र. 3 चे बांधकाम या योजनेमधून प्रस्तावित आहे.

 

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग जि.प ठाणे यांनी प्रस्तावित केलेल्या बी.जे/कन्या शाळा यांच्या बांधकाम विषयक कामांना वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देणे.

 

कार्यासन:- प्रास-5,

दुरध्वनी क्र. 02225362445