महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम , 1977 (दिनांक 6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित) मधील अनुसूची-दोन मधील परिच्छेद-4 मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तिक लाभाची कामे देताना खालील प्रवर्गातील कुटूंबाना प्राधान्य देण्यात येईल.
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
भटक्या जमाती
निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
दारिद्रयरेषेखालील इतर कुटूंबे
स्त्री-कर्ता असलेली कुटूंबे
दिव्यांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
जमीन सुधारणांचे लाभार्थी
इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम , 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी आणि उपरोक्त प्रवर्गामधील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर , कृषि कर्जमाफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांतभूधारक शेतकऱ्यांच्या जमीनीवरील कामांना, शर्तींच्या अधीनतेने प्राधान्य देण्यात येईल.