ठाणे जिल्हा परिषद

           

ता. कल्याण जि.ठाणे

सिंचन विहीर

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत चवरे म्हसरुंडी येथील लाभार्थी श्री. शिवाजी भाऊ शेलार याने सन 2015-16 मध्ये पंचायत समिती कल्याण या कार्यालयांकडून सिंचन विहीरीचा लाभ देण्यात आलेला होता. सदर लाभार्थी याने सिंचन विहिरीचे काम पुर्ण केलेले आहे. सदर लाभार्थी सिंचन विहिरीचा लाभ मिळण्यापुर्वी स्वत:च्या शेतीमध्ये पावसाळयात भात शेती करत असून इतर हंगामात पाण्याअभावी कोणतेही पिक घेऊ शकत नसे व सोजगारासाठी त्याला इतर ठिकाणी जावे लागत होते. सिंचन विहिरीचा लाभा देण्यात आल्याने त्याला बारमाही पाण्याची सोय झालेली असून भात हंगामानंतर लाभार्थ्याने भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याला त्याच्या शेतात कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झालेला आहे व भाजीपाला विक्रीपासून त्याला प्रतिवर्षी रक्कम रुपये 75,000/- निव्वळ नफा मिळत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मिळालेल्या सिंचन विहिरीमुळे त्याला कायमस्वरुपी रोजगार व त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे राहणीमानात सुधारणा झाली आहे असे लाथार्थी याने सांगितले आहे.