ठाणे जिल्हा परिषद

           

ग्रामीण भागात राहाणा-या व अंगमेहनतीची कामे करणा-या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्याची रोजगार हमी योजना व केंद्राची ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली आहे.

सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला.ठाणे जिल्हयात 1 एप्रिल 2007 पासुन सुरु करण्यात आली.

अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र (MGNREGS) या योजनेंतर्गत केंद्र शासन 100 दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व 100 दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब 100 दिवसावरील प्रत्येक मजुराच्या,मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.

ब) प्रतीतदिन मजुरीचे दर केंद्र शासन निर्धारीत करते. 1 एप्रिल 2022 पासून महाराष्ट्र राज्यासाठी हा दर 256/- इतका आहे. सन 2021-22 मध्ये मजुरीचा दर हा 248/- इतका होता.

क)अकुशल भाग 60 % अकुशल व कुशल भाग 40 % असणारी कामे योजनेत समाविष्ट आहेत.

ड) ऑनलाईन पध्दतीने माहितीचे संकलन केले जाते. सर्व माहीती nrega.nic.in संकेतस्थळावर उपलव्ध

मनुष्यदिवस निर्मिती

सन 2021-22 या वर्षात ठाणे जिल्हयात निर्माण झालेली मनुष्यदिवस निर्मिती 3,41,146/- एवढी झालेली आहे.

ग्रामपंचायतीमार्फत झालेली कामे सन 2021-22
  • हाती घेतलेली कामे : 1,449

  • पुर्ण कामे : 412

  • मनुष्यदिन निर्मिती : 1,60,994

  • खर्च (अकुशल) : 4,04,50,000

  • खर्च (कुशल) : 84,13000