ठाणे जिल्हा परिषद

           


विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

अ.क्र.

योजनेचे नाव

योजनेचा उद्देश(दोन ओळीत)

लाभार्थी/पात्रतेचे निकष

कोणाकडे संपर्क साधावा त्या कार्यासनाचे नाव  व दुरध्वनी क्रमांक-

1

जिल्हा वार्षिक योजना जन  सुविधे करीता वि्शेष अनुदान योजना

ग्रामीण भागात स्मशानभुमी/दफ़नभुमी ची व्यव्स्था करणे व ग्रामपंचायतीचे काम एकत्रीतपणे व सुयोग्यरीत्या चालण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करुन देणे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व महसुल गाव

योजना-1

2

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधेसाठी  वि्शेष अनुदान योजना

5000 ते 10000 हजार लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायतीमध्ये राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मुलभुत सुविधा व रोजगार उपलब्ध करुन देणे

1.पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 10000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा  पर्यावरण विकास आराखडा  करणे बंधनकारक आहे.

योजना-1

2. वरील 1 व्यतिरिक्त पर्यावरणसंतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत पहिल्या वर्षाचे निकष पुर्ण केलेल्या व लोकसंख्या 5000 चे वर आणि 10000 पेक्षा जास्त कमी असणा-या व पर्यावरण संवेदनशिल भागामध्ये समावेश होणा-या , तिर्थक्षेत्र/पर्यटन क्षेत्र दृष्ट्या महत्व असणा-या  ओदयोगिक क्षेत्रात येणा-या प्रमुख नागरी क्षेत्राच्या  5 किमी परिघामध्ये येणा-या ग्रामपंचायती पर्यावरण विकास आराखडा तयार करु शकतील .

3

स्मार्ट ग्रामयोजना

महाराष्ट्र राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणणे .

ग्रामविकास व जलसंधारण वि्भागाकडील शासन निर्णय क्र. व्हीपीएम2610/प्र.क्र.1/पंरा-4,मंत्रालय मंबई दिनांक-18 आगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयामधे मुद्दा क्र. 7 मधील प्रथम , व्दीतीय , तृतिय वर्षाच ग्रामपंचायतीचे पात्रतेचे निकष शासन निर्णया प्रमाणे असतील.

योजना-2

4

कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकणातील ग्रामीण भा्गातील भुमी पुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तसेच कोकणातील विकास कामांची गती वाढविणे करीता ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास हो्णा-या  गावामध्ये पर्यटनाची पायभुत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावाचा विकास करणे.

जिल्ह्यातील समुद्र विकास व समुद्र किना-याची गावे (4 ते 5 गावे फ़क्त).

योजना-1