ठाणे जिल्हा परिषद

           

माहितीचा अधिकार:


आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे

नागरिकांची सनद


प्रस्तवना

आरोग्य विभागाव्दारे आरोग्य विषयक योजना व सेवा उपलध्ब करून देण्यात येतात.  सदर आरोग्य विषयक सेवा आरोग्य संस्थामार्फत देण्यात येतात, त्याची व्याप्ती खालील प्रमाणे

1) प्राथमिक आरोग्य केंद्र             :          33

2) प्राथमिक आरोग्य पथके          :           5

3) जिल्हा परिषद दवाखाने           :           2

4) आयुर्वेदीक दवाखाने              :           1

5) उपकेंद्र                                 :   183

साधारण : पाच ते सहा उपकेंद्रासाठी एक संदर्भ संस्था म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असते.  लोकसंख्येचा विचार केला तर बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 30 हजार लोकसंख्येमागे व आदिवासी क्षेत्रासाठी  20 हजार  लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असते. तसेच बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 5 हजार लोकसंख्येमागे व आदिवासी क्षेत्रामध्ये 3 हजार लोकसंख्येमागे एक उपकेंद्र कार्यरत असते.  बिगर आदिवासी कार्यक्षेत्रातील  प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या सहाय्यसाठी 12 निमवैद्यकीय  अधिकारी व इतर कर्मचारी असतात.  आदिवासी कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 वैद्यकिय अधिकारी व त्यांच्या सहाय्यसाठी 13 निमवैद्यकीय  अधिकारी व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सेवा उपलध्ब आहे.  स्थानिक उदभवणा-या आजरांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अमंलबजावणी करणे, प्रयोगशाळेच्या सेवा व रूग्णवाहिका सेवा इ, कार्य प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शासन निर्णयातील दराने पुरविण्यात येतात.  राज्यशासन व केंद्रशासन यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या आरोग्य विषयक सुचना व कार्यक्रमांची अमंलबजावणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येते.

जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभाग या कार्यालयाकडून पुरविण्यात येणारी सेवा

नागरीकांची सनद

.क्र.

       सेवांचा तपशिल

सेवा पुरविणारे अधिकारी/कर्मचारी यांचे नाव  हुद्या

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत  पुरविल्यास

तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे

नाव  हुद्या

 

1

 

  1. गरोदर मातांची नोंदणी/तपासणी व उपचार 
  2.  सर्व प्रकारचे लसीकरण
  3.  लोहयुक्त गोळया व जीवनसत्वांचे वाटप
  4.  बाळंतपणाच्या सुविधा व प्रसुतीपश्चात सेवा,
  5. निरोध, गर्भनिरोधक गोळयांचे वाटप व तांबी बसविण्याची सुविधा, आवश्यकतेनुसार गर्भपाताचा सल्ला
  6.  आरोग्य सेवा सत्राचे आयोजन
  7. हिवताप, अतिसार , (क्षार संजीवनी) न्युमोनिया व  

     किरकोळ आजारात उपचार

  1. मोतीबिंदूच्या रूग्णांची नोंदणी
  2. लैंगिक आजावरील माहिती व उपचार ,
  3. कुष्ठरोग व क्षयरोग यांचा शोध, उपचार व आरोग्य शिक्षण

 

परिचारीका/प्रसाविका

 

वेळापत्रकानुसार दिलेल्या भेटीनंतर

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

 

2

  1. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अमलबजावणी

    किरकोळ आजारावरील उपचार

  1. गंभीर रूग्णांसाठी संदर्भ सेवा,
  2.  छोटया शस्त्रक्रिया
  3. श्वानदंश/सर्पदंश लस/उपचार,

 

वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी

 

1) आगमनानंतर

2) विविक्षित दिवशी

3) शिबीरांच्या दिवशी

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 


.क्र.

       सेवांचा तपशिल

सेवा पुरविणारे अधिकारी/

कर्मचारी यांचे नाव  हुद्या

सेवा पुरविण्याची

विहित मुदत

सेवा मुदतीत 

पुरविल्यास तक्रार  करावयाच्या

वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव  हुद्या

 

  1. अपघात/न्याय-वैद्यक प्रकरणे/रक्त/लघवी,

     थुंकी-तपासणी

  1. प्राथमिक प्रयोगशाळा तपासणी
  2. बालकांना बीसीजी/पोलिओ/ट्रिपल-पोलिओ, गोवर लस

     टोचणी व अ जीवनसत्वाची मात्रा,

  1. गरोदर स्त्रियांना धर्नुवात प्रतिबंधक लस टोचणी व      

     रक्तक्षय विरोधक गोळयांचे वाटप

  1. कुटुंब नियोजनाच्या पध्दतीची माहिती तसेच इतर स्त्रियांना साधन वाटप (निरोध), तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया वाटणेव तांबी बसवणे. 
  2. तापाच्या रूग्णांवर गृहभेट उपचार, हिवतपाचे रूग्ण शोध व गृहित उपचार,  “अ” जीवनसत्वांची मात्रा देण,
  3. मोतीबिंदू शस्त्रक्रिया,एडस रोगाविषयी माहिती, सल्ला व आरोग्य शिक्षण.

 

 

 

 

3

 

जननी सुरक्षा योजना

 

संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र

 

 

प्रसुतीनंतर सात दिवसांपर्यंत

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

 


.क्र.

       सेवांचा तपशिल

सेवा पुरविणारे अधिकारी

/कर्मचारी यांचे नाव  हुद्या

सेवा पुरविण्याची

विहित मुदत

सेवा मुदतीत  पुरविल्यास तक्रार करावयाच्या

वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव  हुद्या

 

4

 

कुटुंब कल्याण योजना

 

 

 

 

संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र

 

प्रकरणेनिहाय दरमहा

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

 

5

 

गर्भवती मातांना बुडीत मजुरी देणे

 

संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र

 

 

प्रकरणेनिहाय दरमहा

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

 

6

 

मातृत्व अनुदान (आदिवासी मातांसाठी)

 

संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र

 

 

लाभार्थीनिहाय

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,

 

 

7

 

गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी

 

संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी,प्रा.आ.केंद्र

 

 

प्रकरणेनिहाय

 

जिल्हा आरोग्य अधिकारी,